-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज, बुधवारी विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नेत्यांचा नव्याने समावेश केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना डच्चू मिळाल्याने आता केंद्रीय मंत्रिमंडळात ५२ मंत्री असून मंत्रिमंडळ विस्तारात आणखी २९ मंत्र्यांची नियुक्ती करता येऊ शकते. यामध्ये महाराष्ट्रातील काही नावं चर्चेत असली तरी सध्या मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये राज्यातील कोणते नेते आहेत आणि कोणाच्या समावेशाची शक्यता आहे ते जाणून घेऊयात…
-
गडकरींनी वाहननिर्मात्यांसोबत घेतली बैठक
-
गडकरी मोदी सरकारमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत.
-
गडकरींबरोबरच प्रकाश जावडेकर हे मराठमोळं नाव सुद्धा मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये महत्वाच्या पदावर आहे.
-
प्रकाश जावडेकर हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत.
-
महाराष्ट्रातील पीयूष गोयल सुद्धा मोदी सरकारमध्ये महत्वाच्या पदावर आहेत.
-
पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
-
नागपुरात 9 ग्रामपंचायतींचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश
-
शिवसेना, अकाली दल यासारखे घटक पक्ष ‘एनडीए’तून बाहेर पडल्यानंतर रामदास आठवले वगळता सर्व मंत्री भाजपचे आहेत.
-
भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रेसुद्धा मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत.
-
राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही तिन्ही खाती महत्त्वाची आहेत.
-
महाराष्ट्र भाजपामधील महत्वाचं नाव असणारे रावसाहेब दानवेही मोदींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री आहेत.
-
रावसाहेब दानवेंकडे ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी आहे.
-
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा खासदार नारायण राणेंचा समावेश निश्चित मानला जात आहे.
-
राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास राज्यात शिवसेनेविरोधात भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता मानली जाते.
-
खासदार कपिल पाटील यांचीही मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.
-
कपिल पाटील यांच्या माध्यमातून आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल.
-
नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांनाही मोदींच्या मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
-
माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर यांच्या नावाचीही संभाव्य मंत्र्यांच्या यादीत चर्चा आहे.
-
राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चाही जोरात आहे.
Modi Cabinet Ministers From Maharashtra: दिल्लीतही महाराष्ट्राचे तख्त राखणारे नेते
सध्या मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये राज्यातील कोणते नेते आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्या मंत्रालयांची तसेच खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे त्याविषयी…
Web Title: Narendra modi cabinet list of central ministers from maharashtra scsg