• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos punjab bjp leader attacked by farmers in patiala blames police dsp denies allegations scsg

Photos : …अन् ४०० ते ५०० जणांनी भाजपा नेत्याला घेरलं; पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडवलं

या हल्ल्यानंतर भाजपा नेत्यांने आंदोलकांना पोलिसांचं पाठबळ असल्याचा आरोप केला तर पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावत सुरक्षेमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती असं म्हटलंय

July 12, 2021 08:27 IST
Follow Us
  • Bhupesh Aggarwal Attacked By Farmers
    1/12

    पंजाबमधील भारतीय जनता पार्टीचे नेते भुपेश अग्रवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. (सर्व फोटो : एएनआयवरुन साभार)

  • 2/12

    अग्रवाल यांच्यावर पतियाला जिल्ह्यातील राजापुरा येथे शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजेच अग्रवाल यांनी या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा आरोपही केलाय.

  • 3/12

    "५०० शेतकऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी डीएसपी तिवाना (पोलीस उप-अधीक्षक) तेथे उपस्थित होते. त्यांनी मला मुद्दाम चुकीच्या दिशेने पाठवलं. माझ्यासोबत पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली नाही," असं अग्रवाल म्हणाले आहेत.

  • 4/12

    "माझ्या जीवाला धोका आहे. मी अनेकदा येथील एसएसपींना (वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना) फोन केला मात्र त्या फोन कॉल्सला उत्तर देण्यात आलं नाही. आमच्या मागण्यांकडे डीएसपीने फारसे लक्ष दिलं नाही. त्यांनी मुद्दाम हे केलं," असा आरोप अग्रवाल यांनी केलाय.

  • 5/12

    मात्र डीसीपी तिवाना यांनी हे आरोप फेटाळून लावत अग्रवाल आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

  • 6/12

    "सर्व आरोप खोटे आहेत. १०० पोलीस कर्मचारी आणि स्टेशन ऑफिसर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. शेतकरी भाजपा नेत्याच्या घराबाहेर आंदोलन करत होते आणि भाजपा नेत्यांचा कार्यक्रम कार्यालयामध्ये सुरु होता. त्यांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यांच्या गाड्यांपर्यंत नेलं, असं डीसीपींनी सांगितलं आहे.

  • 7/12

    "आम्ही त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत पोहचवल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांना घेरलं असेल पण आमच्यासमोर असा कोणताच प्रकार घडला नाही," असं डीएसपींनी स्पष्ट केलं आहे.

  • 8/12

    पंजाब भाजपाचे सचिव सुभाष शर्मा यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांच्या घरी होतो, तेव्हा हा प्रकार घडल्याचं शर्मा म्हणाले.

  • 9/12

    आम्ही बैठकीत असतानाच ४०० लोकांच्या जमावाने घराभोवती आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी लोकांच्या हातात तलवारी, वीटा आणि बाटल्या होत्या असंही शर्मा यांनी म्हटलं आहे.

  • 10/12

    पोलीस अग्रवाल यांच्याभोवती सुरक्षा कडं बनवून त्यांना गर्दीमधून बाहेर काढत असतानाही शेतकऱ्यांनी दगडफेक केली.

  • 11/12

    हरयाणामध्येही राज्याच्या विधानसभेचे उपसभापती रणबीर गांगवा यांच्या गाडीवर आंदोलक शेतकऱ्यांनी हल्ला केला. सिरसा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत असून त्यापैकी एका जागी हा हल्ला करण्यात आला.

  • 12/12

    अग्रवाल बैठकीला आलेल्या घराजवळ आंदोलकांनी अचानक गर्दी केल्याचं पहायला मिळालं. हरयाणामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. गांगवा यांच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांनी दगडफेक केली. शेतकरी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये गांगवा यांच्या गाडीच्या मागची काच फुटली आहे. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

Web Title: Photos punjab bjp leader attacked by farmers in patiala blames police dsp denies allegations scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.