-
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे.
-
अक्षरशः थरकाप उडवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
-
अफगाणिस्तानातील अनेक नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे.
-
काही नागरिक विमानाला लटकून देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही कुटुंबीयांसोबत घरात लपून बसले आहेत.
-
२००१ मध्ये तालिबानची राजवट संपल्यानंतर भारताने अफगाणिस्तानबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित करत अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
-
भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक महत्त्वपूर्ण रस्ते, धरणे, शाळा रुग्णालये इत्यादी महत्त्वपूर्ण बांधकामांची उभारणी केली.
-
अफगाणिस्तानमध्ये भारताने आतापर्यंत ३ अब्ज डॉलरपेक्षा (२२४ कोटींपेक्षा) जास्त रक्मकेची गुंतवणूक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
-
भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक मोठमोठे विकास प्रकल्पांचे बांधकाम केले आहे. यात भारताने स्वत:चा पैसा गुंतवला आहे.
-
सलमा धरण – सलमा धरण हे भारत-अफगाणिस्तान मैत्रीचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात उभारलेले सलमा धरण हे एक जलविद्युत योजना आहे. या धरणाची निर्मिती २०१६ मध्ये भारताकडून पूर्ण करण्यात आली. भारत-अफगाणिस्तानमधील दृढसंबंध दाखवण्यासाठी देखील या प्रोजेक्टचा उल्लेख केला गेला आहे.
-
या धरणाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या धरणाच्या निर्मितीसाठी भारताने २७.५ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानमधील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक अशी याची ओळख आहे. या धरणातून हेरात प्रांतात हजारो कुटुंबांना पाणी आणि वीज पुरवठा केला जातो.
-
जरांज-डेलाराम महामार्ग – भारताने अफगाणिस्तानमध्ये उभारलेला दुसरा हाय-प्रोफाईल प्रकल्प म्हणजे बॉर्डर रोड आर्गनायझेशनने बांधलेला २१८ किमी लांबीचा जरांज-डेलाराम महामार्ग. हा महामार्ग अफगाणिस्तान-इराण बॉर्डर परिसरात आहे. याला खाश रुद नदी-डेलाराम-जरांज महामार्ग म्हणून ओळखले जाते. या महामार्गाची निर्मिती ३०० भारतीय इंजिनिअर्स आणि मजुरांनी एकत्र केली होती.
-
या महामार्गामुळे भारताचा अफगाणिस्तानशी संपर्क सोपा झाला होता. यामुळे पाकिस्तानची आवश्यकता यात राहिली नव्हती. भारताने इराणच्या चाबहार बंदराद्वारे, जरांज-डेलाराम महामार्गाद्वारे ७५ हजार टन गहू अफगाणिस्तानला निर्यात केला होता. या महामार्गाचे उद्घाटन अफगाणिस्तानातील माजी राष्ट्रपती हमीद करझई आणि माजी परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले होते.
-
अफगाणिस्तान संसद भवन – २०१५ मध्ये भारताने अफगाणिस्तानची संसद भवनाची उभारणी केली. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ९ कोटी डॉलरचा खर्च झाला होता.
-
अफगाण संसद भवनातील एका ब्लॉकला नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हे संसद भवन अफगाणिस्तानात भारतीय लोकशाहीच्या विजयाचे प्रतिक बघितले जाते.
-
स्टोअर महल – अफगाणिस्तानातील या ऐतिहासिक महालाची पुनर्निर्मिती २०१६ मध्ये भारताने केली होती. या महालात १९१९ मध्ये ऐतिहासिक रावलपिंडी करार झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाले होते. १९६५ पर्यत अफगाण सरकारचे परराष्ट्र मंत्रालय याच महालात होते.
-
मात्र त्यानंतर भारताच्या आगा खान ट्रस्टने भारत आणि अफगाणिस्तान सरकारबरोबर केलेल्या करारानंतर याची पुर्ननिर्मिती करण्यात आली होती. या नवीन महालाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी केले होते.
-
आरोग्य सेवा प्रकल्प – भारताने बदाखशान, बल्ख, कंधार, खोस्त, कुनार, नंगरहार, निमरुझ, नूरिस्तान, पक्टिया आणि पक्तिका या सीमावर्ती प्रांतात अनेक आरोग्यसेवा केंद्रे बांधली आहेत. भारताने १९७१ मध्ये बनवलेल्या 'इंदिरा गांधी इन्स्टिट्युट फॉर चाइल्ड हेल्थ' हे हॉस्पिटलला १९९६ मध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर पाडण्यात आले होते.
-
मात्र पुन्हा २००१ मध्ये तालिबान्यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्या हॉस्पिटलला पुन्हा बांधण्यात आले होते. २००७ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. काबूलमधील हे हॉस्पिटल लहान मुलांसाठीचे अफगाणिस्तानातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. त्याशिवाय 'इंडियन मेडिकल मिशन' द्वारे या भागात मोफत सल्ला शिबिरेही आयोजित केली जातात.
-
वीज निर्मिती आणि प्रसारण प्रकल्प – भारताने बागलाण प्रांताची राजधानी पुल-ए-खुमरी येथून 220kV DC वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पातून राष्ट्रीय राजधानी काबूलला वीज पुरवठा केला जातो.
-
त्यासोबतच भारताने अफगाणिस्तानातील अनेक प्रांतांमध्ये दूरसंचार प्रकल्प आणि पायाभूत सुविधा पुर्नरचना केली आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्वीटर)
‘त्या’ २२४ कोटींचं काय होणार? जाणून घ्या अफगाणिस्तानमधील भारताच्या गुंतवणूकीबद्दल
Web Title: India investments in afghanistan at risk after taliban takeover nrp