-
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
-
राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
-
राज यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केलाय.
-
अमित ठाकरे यांच्या हस्ते घराच्या पाटीचं अनावरण करण्यात आलं होतं.
-
राज यांच्या घराच्या गृहप्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
भाजपा आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर राज आणि फडणवीस यांची ही भेट म्हणजे शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नसली, तरी या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
-
दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या या नवीन घराला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही होत्या.
-
राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोमध्ये अमित ठाकरेही दिसत आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच राज यांच्या या नव्या घरी संजय राऊत यांनी भेट दिली होती. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत ‘शिवतिर्थ’वर गेले होते. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन)
Inside Pics: राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस एकाच फोटोत… ‘शिवतीर्थ’वरील ‘राजभेटी’चे खास फोटो
फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे यातून वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे.
Web Title: Inside photos raj thackeray devendra fadnavis meeting at his new home shivtirtha scsg