-
इस्रायलमध्ये सध्या करोनाची पाचवी लाट आली आहे.
-
जून महिन्यामध्ये स्वत:ला करोनामुक्त घोषित करणारा हा देश आज ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रभावामुळे पुन्हा करोनाच्या विळख्यात अडकलाय.
-
देशाचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी देशातील नागरिकांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं.
-
तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होमसारख्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असंही बेनेट म्हणाले. नफ्ताली बेनेट यांनी रविवारी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी देशाला संबोधित केलं.
-
टिव्हीवरुन प्रसारीत करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये प्रवासावर काही प्रमाणात बंधनं घालण्यात आल्याचं सांगितलं.
-
मात्र मागील महिन्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण देशात आढळल्यानंतर निर्बंध घालूनही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केलीय.
-
इतकंच नाही तर पुढील काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या वाढणार असल्याचा अंदाजही पंतप्रधानांनी व्यक्त केला असून यासंदर्भात देशवासियांना इशारा दिलाय.
-
रविवारी सकाळीच इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागारांच्या समितीने अमेरिकेला ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रेड लिस्टेड देशांच्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी केली होती.
-
मात्र पंतप्रधान बेनेट यांनी यासंदर्भातील कोणताही उल्लेख आपल्या भाषणात केला नाही.
-
रेड लिस्टमधील देशांमध्ये प्रवास करण्यासाठी विशेष परावनगी आवश्यक असते.
-
मात्र पंतप्रधान बेनेट यांनी यासंदर्भातील कोणताही उल्लेख आपल्या भाषणात केला नाही.
-
इस्रायलमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे १३४ रुग्ण आढळून आले आहेत.
-
तर ३०७ जण हे ओमायक्रॉनचे संक्षयित रुग्ण असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. यापैकी १६७ जणांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणं दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशात काही ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आलेत.
-
दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा ओमायक्रॉनचा विषाणू आढळून आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेबरोबरच हाँग काँग आणि इस्रायलनेही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर २५ नोव्हेंबरपासून बंदी घातली होती.
-
परदेशातून येणाऱ्या इस्रायली नागरिकांना तीन ते १४ दिवसांचे क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे.
-
एकीकडे देशातील नागरिकांना प्रवास न करण्याचं आवाहन पंतप्रधान बेनेट करत असतानाच दुसरीकडे ते पत्नी आणि मुलांसोबत परदेशात पर्यटनासाठी गेले होते.
-
यावरुनही बेनेट यांच्यावर बरीच टीका होत असल्याचं पहायला मिळत आहे.
-
करोनामुक्तीच्या घोषणेनंतर इस्रायलनेही पर्यटनाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा देशामध्ये लॉकडाउन लावण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)
सहा महिन्यात चित्र पालटलं… जूनमध्ये करोनामुक्त झालेल्या देशात करोनाची पाचवी लाट; PM म्हणाले, “वर्क फ्रॉम…”
या देशाने करोनामुक्तीची घोषणा केली होती त्यानंतर जगभरामधून या देशाचं कौतुक झालं होतं.
Web Title: Omicron israel in middle of fifth covid 19 wave naftali bennett address the nation scsg