-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधानांचे तुकाराम पगडी आणि अभंग लिहिलेल्या उपरण्याने स्वागत केले जाणार आहे.
-
देहू संस्थांनच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ही तुकाराम डिझायनर पगडी साकारली आहे.
-
जगद्गुरू तुकाराम महाराज वापरत होते तशा स्वरूपाची या पगडीची रचना करण्यात आली आहे.
-
बदामी रंगाच्या रेशमी वस्त्राची तुळशीच्या मण्यांचा वापर करून ही पगडी बांधण्यात आली आहे.
-
पगडीच्या मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.
-
ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवण्यात येईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे.
-
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ हा अभंग सुलेखनाद्वारे रेखाटला आहे.
-
पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा दिसतील.
-
सजावट करताना दोन्ही बाजूला लोडवर चिपळी आणि टाळ ही प्रतिके ठेवण्यात आली आहेत.
-
उपरणेसाठीही वेगळे आणि विशेष कापड वापरण्यात आले आहे.
-
उपरणेवर तुकाराम महाराजांचे अभंग रेखाटण्यात आले आहेत.
-
१२ जूपर्यंत ही पगडी आणि उपरणे देहू संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे.
Photos : पंतप्रधानांसाठी पुण्यात तयार होत आहे खास ‘तुकाराम पगडी’; काय आहे यामध्ये विशेष? घ्या जाणून
उत्सवाच्या तोंडावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे या उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
Web Title: Creating of special designer tukaram pagdi for pm narendra modi