-
१२ जून २०२२ रोजी भिवंडीमधील गुमतारा किल्ल्यावर शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
-
किल्ल्यावर तटबंदी,बुरुज आणि प्रवेशद्वारास फुले, तोरणाची सजावट करण्यात आली होती.
-
संवर्धित झालेल्या प्रवेशद्वार पूजन करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला यावेळी अभिषेक करण्यात आला.
-
गडाचा मुख्य प्रवेशद्वार हा मोठ्या दगडांनी गाडला गेला होता. फक्त २.३ फूट एवढ्याच भाग आणि प्रवेशद्वाराचे कमानी स्तंभ दिसत होते. संस्थेच्या भिवंडी विभागातर्फे दुर्गसंवर्धन मोहिमा राबवून हे काम अत्यंत कमी कालावधीत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या कामानंतर प्रवेशद्वार ९.२फूट उंच,१४ फुट लांब आणि ६ फुट रुंद, एवढे मोकळे झाले. तसेच पूर्वी खडकात खोदलेल्या १० पायऱ्या आणि बुरुज दिसू लागला.
-
यावेळी इतिहास आणि संवर्धनपर विशेष परिसंवाद चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
-
हा किल्ला १९९४ फुट (५८५ मीटर) एवढ्या उंचीवर असून प्रसिद्ध वज्रेश्वरीदेवी मंदिरापासून ४ किमी अंतरावर आहे.
PHOTOS: शिवरायांचे खरे मावळे… किल्ल्याची डागडुजी, संवर्धन करत साजरा केला शिवराज्यभिषेक दिन
गुमतारा किल्ला १९९४ फुट (५८५ मीटर) एवढ्या उंचीवर असून प्रसिद्ध वज्रेश्वरीदेवी मंदिरापासून ४ किमी अंतरावर आहे
Web Title: Shivrajyabhishek din celebration on gumtara fort bhivandi maharashtra sgy