-
जुलै महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून तुमच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंधित अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या खिशावर होणार आहे. या बदलांमुळे तुमच्यावर आर्थिक बोजा वाढू शकतो
-
तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सावधान. तुमचे ट्रेडिंग खाते केवायसी ३० जूनपर्यंत पूर्ण करा अन्यथा तुमचे खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. असे झाल्यास तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही.
-
तुम्ही अद्याप तुमचे आधार-पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर सक्रिय व्हा. तुमच्याकडे आता फक्त १० दिवस आहेत. आधार पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे.
-
३० जूनपूर्वी हे काम न केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल. मात्र, त्यानंतर तुम्हाला दुप्पट नुकसान भोगावे लागू शकते.
-
सिलिंडरच्या किमती ज्या प्रकारे सातत्याने वाढत आहेत, ते पाहता १ जुलै रोजी एलपीजी गॅसच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
-
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी १ जुलैपासून मोठा बदल होत आहे. वास्तविक, ३० टक्के करानंतर या लोकांना आणखी एक मोठा झटका बसणार आहे.
-
आता क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना १ टक्के टीडीएस भरावा लागेल. तसेच तुमचे नुकसान होत असले तरीही तुम्हाला TDS भरावा लागेल.
-
हा बदल विशेषतः दिल्लीकरांसाठी आहे. दिल्लीत तुम्ही ३० जूनपर्यंत मालमत्ता कर जमा केल्यास तुम्हाला १५ टक्के सूट मिळेल.
-
पण लक्षात ठेवा की ३० जूननंतर ही सूट मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अद्याप मालमत्ता कर जमा केला नसेल, तर लवकर करा.
Photos : १ जुलैपासून ‘या’ पाच मोठ्या नियमांमध्ये होणार बदल, तुमच्या थेट खिशावर होणार परिणाम; कसा? घ्या जाणून
दैनंदिन व्यवहारासंबंधी या पाच मोठ्या बदलामुळे तुमच्या खिश्यावर आणखी ताण वाढू शकतो.
Web Title: Major changes in pan aadhaar link deadline crypto property tax from 1 julay dpj