-   EPFO e-Nomination process: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. 
-  ई-नॉमिनेशनमुळे ईपीएफ खातेधारकाचे अकाली निधन झाले तर नॉमिनीसाठी नमूद करण्यात आलेल्या कुटुंबाच्या सदस्याला आर्थिक लाभ मिळणे सोईस्कर होणार आहे. 
-  पीएफ अकाऊंट होल्डर आता दोनपेक्षा अधिक कुटुंबीयांची नॉमिनी म्हणून नोंद करू शकतो. 
-  पीएफ खातेधारकाने ई-नॉमिनेशन केले नाही तर त्याला आपल्या खात्यात असलेली रक्कमदेखील पाहता येणार नाही. 
-  ई नॉमिनेशन करण्यासाठी पीएफ खातेधारकाचा यूएएन नंबर सक्रीय असणे गरजेचे आहे. तसेच खातेधारकाचा मोबाईल क्रमांकही आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. 
-  ई-नॉमिनेशनची प्रक्रिया करण्यासाठी EPFO ऑफिशियल वेबसाईट epfindia.gov.inवर जावे लागेल. त्यानंतर सर्व्हिस टॅबवर क्लीक करावे. 
-  त्यानंतर ड्रॉडाऊन मेनूमधून For Employees हा ऑप्शन सिलेक्ट करावा. 
-  त्यानंतर UAN नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगीन करावे. लॉगीन केल्यानंतर मॅनेज असा ऑप्शन दिसेल. 
-  त्यानंतर ई-नॉमिनेशनचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर पत्ता मूळ पत्ता तसेच सध्या राहत असलेला पत्ता टाकावा. 
-  त्यानंतर फॅमिली डिक्लेरेशनमध्ये बदल करण्यासाठी येस हा ऑप्शन सिलेक्ट करावा. 
-  त्यानंतर ज्या व्यक्तीला नॉमिनी करावयचे आहे, त्या कुटुंबीयाची माहिती भरून सेव्ह ऑप्शनवर क्लीक करावे. 
-  यानंतर ई-साईन ऑप्शनवर क्लीक करावे. तसेच तुमचा आधार क्रमांक टाकावा. आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. 
-  ओटीपी टाकल्यानंतर ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. 
EPFO : ईपीएफ खातेधारक एका पेक्षा जास्त व्यक्तीला बनवू शकतात वारसदार, जाणून घ्या ई-नॉमिनेशनची प्रक्रिया
पीएफ खातेधारकाने ई-नॉमिनेशन केले नाही तर त्याला आपल्या खात्यात असलेली रक्कमदेखील पाहता येणार नाही.
Web Title: Epf member can make more than two nominees know epfo e nomination process prd