-
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. (सर्व फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्स्प्रेस)
-
सध्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी बरसत आहेत.
-
मुंबई शहर तसेच उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
-
आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नोकरदारांची धावपळ उडाली.
-
नवी मुंबईतदेखील जोरदार सरी बरसल्या. येथे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
-
नवी मुंबईतील सानपाडा परिसरात तर रस्त्यांचे रुपांतर नदीत झाले होते. येथे गुडघ्यापर्यंत पाणी चालले होते.
-
सर्वदूर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहाया मिळाला.
-
दरम्यान, सध्या मुंबई तसेच उपनगरांत पावसाने जोर धरला असून आगामी काही दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता आहे.
-
सध्या हवामान खात्याने रायगड, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
तर धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवी मुंबईत पाऊसच पाऊस! रस्त्यांची झाली नदी, वाहतूक विस्कळीत
सध्या मुंबई तसेच उपनगरांत पावसाने जोर धरला असून आगामी काही दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता आहे.
Web Title: Heavy rain in navi mumbai water logging in sanpada area today prd