Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ramdas athawale 10 important sentences on rpi rebel shivsena uddhav thackeray rno news pbs

Photos : आरपीआयमधील फूट, पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाची भूमिका ते शिवसेनेतील बंडखोरी; रामदास आठवलेंची १० मोठी विधानं

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवलेंनी केलेल्या याच वक्तव्यांचा हा आढावा.

August 16, 2022 21:10 IST
Follow Us
  • भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आरपीआयमधील फूट, पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाची भूमिका ते शिवसेनेतील बंडखोरी अशा विविध विषयांवर मोठी वक्तव्य केली आहेत.
    1/12

    भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आरपीआयमधील फूट, पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाची भूमिका ते शिवसेनेतील बंडखोरी अशा विविध विषयांवर मोठी वक्तव्य केली आहेत.

  • 2/12

    मंगळवारी (१६ ऑगस्ट) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवलेंनी केलेल्या याच वक्तव्यांचा हा आढावा.

  • 3/12

    १. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. लवकरच याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे निकाल पाहिले तर तसेच दिसतात – रामदास आठवले

  • 4/12

    २. आमच्या पक्षात एकदा फूट पडली होती. आर. एस. गवई, जोगेंद्र कवाडे आणि मी असे तिघेजण एकत्र होतो – रामदास आठवले

  • 5/12

    ३. आरपीआयमध्ये त्यावेळी कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून आमच्यात वाद झाला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो आणि गवई व कवाडे काँग्रेससोबत गेले – रामदास आठवले

  • 6/12

    ४. आमचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. त्यावेळी दोन खासदार गवईंच्या बाजूने असल्याने आमच्या पक्षाचं ‘उगवता सूर्य’ चिन्ह गवईंना मिळालं होतं – रामदास आठवले

  • 7/12

    ५. आरपीआय पक्ष फुटला तेव्हा माझ्या बाजूने संपूर्ण पक्ष होता, तरी आम्हाला पक्षाचं चिन्ह मिळालं नव्हतं – रामदास आठवले

  • 8/12

    ६. आता शिवसेनेत २/३ पेक्षा अधिक आमदार व खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं – रामदास आठवले

  • 9/12

    ७. उद्धव ठाकरे यांच्याकडे १५ आमदार आहेत. सहा खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही मान्यता मिळेल, मात्र दुसरं पक्षचिन्ह घ्यावं लागेल. धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क आहे,” असंही आठवलेंनी नमूद केलं – रामदास आठवले

  • 10/12

    ८. मोदींविरोधात कोणताही एक चेहरा चालणार नाही. मोदींचा चेहरा इतका मजबूत आहे की तिथं दुसरे चेहरे चालणारच नाही – रामदास आठवले

  • 11/12

    ९. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असे अनेक चेहरे मोदींसमोर असले तरी त्याला घाबरण्याचं कारण नाही – रामदास आठवले

  • 12/12

    १०. मी मोदींच्या पाठिशी असल्यानंतर त्यांना चिंता करण्याची आवश्यकता अजिबात नाही. २०२४ मध्ये आम्ही ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येऊ – रामदास आठवले

TOPICS
रामदास आठवलेRamdas AthawaleशिवसेनाShiv Sena

Web Title: Ramdas athawale 10 important sentences on rpi rebel shivsena uddhav thackeray rno news pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.