Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nasa new moon mission postpond know is that mission spb

POHOTO : नासाचे मिशन चंद्रयान लांबणीवर; जाणून घ्या नेमकी काय आहे ही मोहीम…

अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-१ चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.

August 30, 2022 19:58 IST
Follow Us
  • अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-१ चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. यानाचे प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०३ वाजता होणार होते.
    1/12

    अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-१ चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. यानाचे प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०३ वाजता होणार होते.

  • 2/12

    मात्र, यानाच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही मिनिटापूर्वीच उड्डाण थांबवण्यात आले. २ सप्टेंबर रोजी रात्री १०.१८ वाजता यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

  • 3/12

    नासाच्या नव्या नियोजनांतर्गत हे यान २०१६ मध्ये प्रक्षेपित केले जाणार होते. यानंतर, डोनाल्ड ट्रम्प सरकारने २०१७ मध्ये या मोहिमेला ‘आर्टेमिस मिशन’ असे अधिकृत नावही दिले.

  • 4/12

    मात्र, २०१९ मध्ये, तत्कालीन नासा प्रशासक जिम ब्रिडेनस्टीन यांनी या मोहिम रद्द करत पुढे ढकलली.

  • 5/12

    एका सरकारी अहवालानुसार नासाच्या मोहिमेत विलंब झाल्यामुळे सरकारचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत असल्याचे समोर आले.

  • 6/12

    आर्टेमिस-१ ही मानवरहित मोहीम आहे. शास्त्रज्ञांनी चंद्रावरील परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे या अभ्यास करण्यासाठी ही मोहीत आहे.

  • 7/12

    नासाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन एसएलएस मेगा यान आणि ओरियन क्रू कॅप्सूल चंद्रावर पोहोचणार होते. अंतराळवीर सहसा क्रू कॅप्सूलमध्ये राहतात, परंतु यावेळी ते रिक्त असेल.

  • 8/12

    हे मिशन ४२ दिवस २ तास २० मिनिटांचे होते. त्यानंतर कॅप्सूल पृथ्वीवर परत येणार होते. हे यान एकूण २० लाख ९२ हजार १४७ किलोमीटरचा प्रवास करणार होते.

  • 9/12

    कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ जॅक बर्न्स यांच्या म्हणण्यानुसार आर्टेमिस-१ यान एक ‘हेवी लिफ्ट’ आहे आणि यानाद्वारे तयार केलेले सर्वात शक्तिशाली इंजिन आहे.

  • 10/12

    ते चंद्रावर जाईल, त्याच्या कक्षेत (कक्षेत) काही छोटे उपग्रह सोडेल आणि नंतर स्वतःच कक्षेत स्थापित होईल.

  • 11/12

    २०२४ च्या आसपास आर्टेमिस-२ लाँच करण्याची नासाची योजना आहे. त्यात काही अंतराळवीरही जातील, पण ते चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. चंद्राच्या कक्षेत फिरूनच ते परत येतील.

  • 12/12

    नासाच्या महानिरीक्षक कार्यालयाच्या ऑडिटनुसार, २०२५ पर्यंत, या प्रकल्पाची किंमत ७,३३४ अब्ज रुपये होईल. तसेच प्रत्येक फ्लाइटची किंमत ३२७ अब्ज रुपये हाईल. द वॉशिंग्टन पोस्टमधील एका अहवालानुसार, मिशनची प्री-लाँचची किंमत ७० अब्ज ते १५९ अब्ज आहे.

  • फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस
TOPICS
नासाNasa

Web Title: Nasa new moon mission postpond know is that mission spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.