• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modi dedicates to the nation shri mahakal lok to the nation msr

PHOTOS : जणूकाही साक्षात ‘देव लोक’ नगरीच ‘भू लोक’वर अवतरली

पाहा पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या उज्जैन येथील “श्री महाकाल लोक” ची सुंदर छायाचित्रे

October 11, 2022 20:58 IST
Follow Us
  • मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भगवान महाकालची प्रार्थना केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवार) वैदिक मंत्रोच्चारात
    1/23

    मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भगवान महाकालची प्रार्थना केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवार) वैदिक मंत्रोच्चारात “श्री महाकाल लोक”चे लोकार्पण केले.

  • 2/23

    हे अद्भूत संकुल बांधण्यासाठी मध्य प्रदेश सरकार ४२१ कोटी रुपयांचे योगदान देणार आहे.

  • 3/23

    केंद्र सरकारकडून २७१ कोटी रुपये दिले जाणार आहे.

  • 4/23

    तर २१ कोटी रुपयांचा खर्च मंदिर समिती उचलणार आहे.

  • 5/23

    या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आज संध्याकाळीच उज्जैनला पोहोचले होते.

  • 6/23

    महाकाल संकुल २० हेक्टरमध्ये बांधण्यात येत आहे.

  • 7/23

    उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडॉरपेक्षा हे चौपट मोठे आहे.

  • 8/23

    पौराणिक रुद्रसागर तलावाच्या काठावर महाकाल कॉरिडॉर विकसित करण्यात आला आहे.

  • 9/23

    भगवान शिव, देवी सती आणि इतर धार्मिक कथांशी संबंधित सुमारे २०० शिल्पे आणि भित्तिचित्रे येथे कोरलेली आहेत.

  • 10/23

    येथे सप्त ऋषींच्या भव्य आणि विशाल मूर्ती, नवग्रह मंडळ, त्रिपुरासुर वध, १०८ स्तंभात भगवान शिवाचे आनंद तांडव, शिवस्तंभ, प्रवेशद्वारावर विराजमान केलेले नंदी आहेत.

  • 11/23

    महाकाल लोक प्रकल्पाचा पहिला टप्पा यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

  • 12/23

    यामुळे यात्रेकरुंचा मंदिर पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध होण्यास मदत होईल.

  • 13/23

    या प्रकल्पाचा उद्देश संपूर्ण वारसा वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार यावर विशेष भर देणे आहे.

  • 14/23

    या प्रकल्पाअंतर्गत मंदिर परिसराचा सातपट विस्तार करण्यात येणार आहे.

  • 15/23

    विशेष म्हणजे यामुळे राज्यातील आणि विशेषतः उज्जैनमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

  • 16/23

    उज्जैनमध्ये दरवर्षी लाखो लोक महाकालच्या दर्शनासाठी येतात.

  • 17/23

    या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ८५० कोटी रुपये आहे.

  • 18/23

    कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यापूर्वी मोदींनी महाकालमध्ये भगवान शिवाची पूजा केली.

  • 19/23

    सायंकाळी सहाच्या सुमारास मोदी मंदिराच्या गर्भगृहात गेले. त्यांनी पारंपारिक धोतर परिधान केले होते आणि गमछा घातला होता.

  • 20/23

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेही पंतप्रधान मोदींसोबत होते.

  • 21/23

    “शंकराच्या सहवासात काही सामान्य नाही. सर्व काही अलौकिक, विलक्षण आहे. अविस्मरणीय, अविश्वसनीय.” असं मोदींनी म्हटलं आहे.

  • 22/23

    जिथे महाकाल आहे, तिथे कालखंडाच्या सीमा नाहीत.असंही मोदी म्हणतात.

  • 23/23

    महाकालाच्या आशीर्वादाने भारताची भव्यता संपूर्ण जगाच्या विकासाच्या नव्या शक्यतांना जन्म देईल – पंतप्रधान मोदी

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Pm modi dedicates to the nation shri mahakal lok to the nation msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.