-
शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीचा राष्ट्रवादी संधी म्हणून पाहते का?, यावर आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. ते ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
-
रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादी याकडे संधी म्हणून पाहत नाही. प्रत्येक पक्ष आपली संघटना वाढवण्यासाठी रणनीती आखतो. मात्र, शिवसेनेत उभी फुट पडल्याने आम्हाला आनंद झाला नाही.
-
सत्तांतराच्या आणि शिवसेनेतील फुटीच्या या घटनेने राज्याचा विकास आणि धोरणांवर बोलतच नाही. हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक धोकादायक काळ आहे.
-
साम, दाम, दंड भेद या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत सत्ता कशी मिळवता येईल, याचा विचार होतो, असेही रोहित पवारांनी म्हटलं.
-
शिवसेनेतील बंडखोरी थोपवण्यासाठी उद्धव ठाकरे अपयशी ठरले का?, यावरही रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.
-
शिवसेनेत आमदार फुटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पक्षातील बंड थोपवण्यात अपयश आलं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते.
-
मात्र, बंडखोरी केलेले ४० आमदार परत येतील, असा विश्वास होता. बंड करण्याची तयारी एक, दोन महिन्यापूर्वी नाहीतर, एक ते दीड वर्षापासून सुरु होती.
-
याची जाणीव सर्वांना होती. पण, बंडखोरीनंतर १० ते ११ आमदार फुटतील, असे वाटलं होतं. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना भेटू शकलो नाही. अन्यथा मी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना भेटून बैठका करत होतो.
-
नुकतेच एका मंत्र्याला भेटायला कामानिमित्त भेटण्यास गेलो होते. तेव्हा त्यांच्या कार्यालयाबाहेर २० आमदार उभे राहिले होते. ते पाहून पूर्वीची राजकीय स्थिती चांगली होती, असेही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून