• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aaditya thackeray hug nitin deshmukh in shivsena shetkari melava in akola ssa

Photos : “स्वतःचा इमान न विकणाऱ्या सच्च्या शिवसैनिकाला मिठी मारायला आलोय”

“गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Updated: November 7, 2022 21:10 IST
Follow Us
  • शिवसैनिक म्हणून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वत:ला विकलं नाही, स्वत:चा मान सन्मान आणि इमान विकलं नाही, अशा व्यक्तीला मिठी मारायला आलो आहे, असे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
    1/12

    शिवसैनिक म्हणून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वत:ला विकलं नाही, स्वत:चा मान सन्मान आणि इमान विकलं नाही, अशा व्यक्तीला मिठी मारायला आलो आहे, असे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

  • 2/12

    आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती, म्हणून त्यांनी गुवाहाटीत जात गद्दारी केली.

  • 3/12

    त्या गद्दारांना जनता धडा शिकवणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते अकोल्यातील बाळापूरमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

  • 4/12

    आदित्य ठाकरेंनी सांगितलं, महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना २.५० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली.

  • 5/12

    सुभाष देसाई यांनी करोना काळात ६.५० लाख कोटींची गुंतवणूक आणली. मात्र, हे घटनाबाह्य सरकार आहे.

  • 6/12

    गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

  • 7/12

    राज्यात शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढले असून, उद्योग बाहेर गेले आहेत.

  • 8/12

    महाराष्ट्रातील लोकांना खरे मुख्यमंत्री कोण आहे, याची माहिती नाही. ते गद्दारीचा शिक्का डोक्यावर घेऊन फिरत आहे.

  • 9/12

    उद्योगमंत्र्यांचे नाव कोणाला माहिती नाही. आमचे सरकार असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

  • 10/12

    अब्दुल सत्तारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परवा कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणाले. होय, मी छोटा पप्पू असेल.

  • 11/12

    मला नावं ठेऊन जर महाराष्ट्राची सेवा होत असेल, तर मला अजून १०० नावं ठेवा. पण या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करा. या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रात पळवून लावलंय.

  • 12/12

    येथून पुढेही महाराष्ट्रात तुम्हाला असंच पळून लावणार, पळवत ठेवणार. कारण तुम्ही जी गद्दारी केलीये, ती या महाराष्ट्राला पटली नाही, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Aaditya thackeray hug nitin deshmukh in shivsena shetkari melava in akola ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.