राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.
आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष होते, ज्याची स्थापना १७ ऑक्टोबर २०१० रोजी झाली होती आणि ती भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडला विरोध करताना पर्यावरणवाद्यांसह या आंदोलनात आदित्य खांद्याला खांदा लावून सहभागी होते. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे सरकारने या कारशेडला स्थगिती दिली होती, जी नंतर एकनाथ शिंदे सरकारने उठवली व आरेमध्येच कारशेड बांधण्याचे नक्की केले.
आदित्य ठाकरे यांना कविता करायला आवडतात. त्यांनी मुंबईची स्वच्छता आणि हरित वाहतूक यासह संबंधित कारणांसाठी प्रचारक म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. ते प्लॅस्टिक बंदीसाठी देखील जोर देत आहेत आणि मुंबईतील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहेत जे मुख्यत्वे त्यांच्या पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिके अंतर्गत येते.Read More
कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेससह विविध पर्यावरणवादी आणि स्वंयसेवी…
Maharashtra Political Crisis Updates : राज्यपालांचा एकंदरीत कारभार, विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोदांची नियुक्ती आणि उद्धव टाकरे यांनी दिलेला राजीनामा या…
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंकडून आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील भूखंड घोटाळ्याच्या आरोपापर्यंत…