-
त्रिपुरारी पोर्णिमा म्हणजेच देव दिवाळीनिमित्त दक्षिण मुंबईतील बाणंगगा तलाव येथे महाआरती करण्यात आली.
-
मुंबई तसेच उपनगरातील अनेक मंदिरांमध्ये नागरिकांनी दीप प्रज्वलन दीपोत्सव साजरा केला.
-
असंख्य दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर अगदी झगमटून गेले होते.
-
हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी याठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
-
देव दिवाळी साजरी करण्यामागेही पौराणिक कथा आहे.
-
त्रिपुरासुर राक्षसाचे अत्याचार आणि अधर्मामुळे पृथ्वी, स्वर्ग आणि नरक अशा तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला होता.
-
यासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. यानुसार भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला.
-
यावेळी सर्वांनी आनंदोत्सव साजरा करत दीपदान केले.
-
तेव्हापासून दर वर्षी कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते. या दिवशी शिवपूजा आणि दीपदानाला विशेष महत्त्व असतं.
दिव्यांच्या प्रकाशामुळे दक्षिण मुंबई उजळली; देव दिवाळीनिमित्त बाणंगगा तलाव येथे महाआरती, पाहा खास PHOTOS
असंख्य दिव्यांच्या प्रकाशात हा परिसर अगदी झगमटून गेला होते.
Web Title: Dev dipavali celebrate at banganga lake in mumbai spb