• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos checking the oxygen plants and the newly built 50 bed covid icu with modern facilities at district hospital in aundh in pune msr

PHOTOS : करोनाबाधितांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सज्जतेच्या आढाव्यासाठी विशेष मोहीम

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Updated: December 27, 2022 17:55 IST
Follow Us
  • कोविड प्रकरणांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची सज्जता तपासण्यासाठी मंगळवारी पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयात आधुनिक सुविधांसह ऑक्सिजन प्लांट आणि नव्याने बांधलेल्या ५० बेडच्या कोविड-आयसीयूची तपासणी केली केली गेली. ( फोटो - अरुल होरायझन)
    1/14

    कोविड प्रकरणांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची सज्जता तपासण्यासाठी मंगळवारी पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयात आधुनिक सुविधांसह ऑक्सिजन प्लांट आणि नव्याने बांधलेल्या ५० बेडच्या कोविड-आयसीयूची तपासणी केली केली गेली. ( फोटो – अरुल होरायझन)

  • 2/14

    पुणे शहरातही अद्याप करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या संपूर्ण नियंत्रणात आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

  • 3/14

    मात्र, हे चित्र बदललेच तर नायडू रुग्णालयासह महापालिकेची सर्व रुग्णालये परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहेत, असा निर्वाळा पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

  • 4/14

    करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

  • 5/14

    या पार्श्वभमीवर देशातील सर्व रुग्णालये, करोना समर्पित रुग्णालये, आरोग्य सुविधा यांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी २७ डिसेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले होते.

  • 6/14

    चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि फ्रान्स आदी देशांमध्ये करोनो रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकारकडून देशातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे.

  • 7/14

    ओमायक्रोनचा नवा विषाण जगभरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे करोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा सज्ज आहे का याची खातरजमा करण्यासाठी ही आढावा मोहीम सुरू आहे.

  • 8/14

    या मोहिमेदरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य सुविधांचा विचार करण्यात येणार आहे.

  • 9/14

    यामध्ये रुग्णालयांमधील खाटांची क्षमता, विलगीकरणासाठी उपलब्ध खाटा, प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा आदींची उपलब्धता तपासली जाणार आहे.

  • 10/14

    तसेच, जीवन रक्षक प्रणाली असलेल्या खाटा, डॉक्टर, परिचारिका, निम्न वैद्यकिय, आयुष डॉक्टर, आशा, अंगणवाडी सेविका यांची उपलब्धता पाहीली जाणार आहे.

  • 11/14

    याशिवाय, करोना व्यवस्थापनावर व्यावसायिक प्रशिक्षित आरोग्य सेवा, शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचारी, जीवन रक्षक प्रणाली वापरण्यासाठी प्रशिक्षित असलेले कर्मचारी यासह इतर कर्मचाऱ्यांचीही उपलब्धता तपासण्यात येणार आहे.

  • 12/14

    प्रगत आणि मूलभूत जीवन समर्थन रुग्णवाहिकांची उपलब्धता, इतर रुग्णवाहिकांची उपलब्धता, रुग्णवाहिका कॉल सेंटरची उपलब्धता, करोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि क्षमता पाहिली जाणार आहे.

  • 13/14

    ही विशेष मोहीम आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

  • 14/14

    या मोहिमेनुसार आरोग्य सुविधांच्या तयारीच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोविड इंडिया पोर्टल’वर ऑनलाइन अर्ज देण्यात आला आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Photos checking the oxygen plants and the newly built 50 bed covid icu with modern facilities at district hospital in aundh in pune msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.