-
पुणे येथील शिलो चर्च परिसरात काल ‘गुड फ्रायडे’ निमित्त ख्रिस्ती धर्माच्या बांधवांनी भगवान येशूच्या जीवनाची संघर्ष कहाणी आणि पटकथा जिवंत देखाव्यातून सादर केली. (सर्व फोटो – Express Photograph by Arul Horizon)
-
भारतामधील ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडेचा दिवस भगवान येशूच्या स्मरणात घालवतात. त्यांच्या येशूबद्दलच्या असलेल्या श्रद्धा, भावना व्यक्त करतात.
-
येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले गेले, त्याच्या बलिदानाचा दिवस ख्रिस्ती धर्मगुरूंनी गुड फ्रायडे या नावाने स्मरणात ठेवायला सुरुवात केली.
-
पण असं असलं तरी ‘होली फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो. -
ख्रिस्ती धर्मग्रंथ ‘बायबल’ नुसार गुड फ्रायडेला ‘उत्तम शुक्रवार’ संबोधण्यात आले आहे. या दिवशी भगवान येशूने आपले जीवन जगाला पापातून मुक्त करण्यासाठी अर्पण केले असं म्हटलेलं आहे.
-
गुड फ्रायडेला येशूने आपले जीवन अर्पण करून प्रेमाचा संदेश दिला. यादिवशी येशूचे अनुयायी चर्चमध्ये एकत्र जमतात आणि येशूच्या प्रेमाची आठवण काढतात तर धर्मगुरू येशूच्या संदेशाचा उपासकांना उपदेश देतात.
-
गुड फ्रायडेला चर्चमध्ये एकत्र जमलेल्या उपासकांना धर्मगुरू उपदेश देतात. भगवान येशूने शेवटच्या क्षणी क्रुसावर बोललेले ७ उद्गार त्यामध्ये समजावले जातात.
-
या उपदेशामध्ये क्षमेचा उद्गार, तारणाचा उद्गार, प्रेमाचा उद्गार, क्लेशाचा उद्गार, दु:ख सहनाचा उद्गार, प्रायश्चिताचा उद्गार आणि परमेश्वराला समर्पित होण्याचा उद्गार यांचा समावेश असतो.
-
येशूला का शिक्षा देण्यात आली होती? येशू हा स्वतःला ईश्वराचा पुत्र मानतो, असा त्याच्यावर आरोप लावला होता. येशू प्रस्थापित धर्माच्या चालीरीती न मानता वागत असल्याचा दावा करण्यात येत होता.
Photo : ‘गुड फ्रायडे’चा इतिहास काय? ख्रिस्ती बांधव यादिवशी काय करतात?
भारतामधील ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडेचा दिवस येशूच्या स्मरणात घालवतात. काल पुण्यात शिलो चर्च परिसरात ख्रिस्ती धर्माच्या बांधवांनी सादर केला देखावा.
Web Title: Remembrance of jesus christ on good friday history act performance spl