-
रेमल चक्रीवादळाचा बराचं तडाखा आपल्या देशाला बसला आहे. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आसाम, मिझोरम, नागलँड आणि मेघालय या राज्यामध्ये भूस्खलन तयार झाले. या सर्व ठिकाणी २५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Photo- PTI)
-
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागलँड मिझोरम, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद भारतीय हवामान विभागाने केली आहे. (Photo- PTI)
-
जोरदार पावसाने रस्त्यावर झाडे उन्मळून पडली तर पाणीही साचले, लोकांची घरे, रस्ते, यांचे नुकसान झाले तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. (Photo- PTI)
-
भारतीय हवामान विभागाने आसाम, मेघालय आणि इतर ईशान्येकडील राज्यात आणखीन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे, यामुळे रस्ते जलमय होतील आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते असेही सांगण्यात आले आहे. (Photo- PTI)
-
मिझोरामच्या ऐझॉलजवळ मुसळधार पावसातील भूस्खलनामुळे डोंगराची कडा घसरून खाली असलेल्या रहिवासी लोकांच्या घरांवर कोसळली या घटनेत किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Photo- PTI)
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट त्यांच्या एक्स खात्यावरून शेअर केली आहे. (Photo- PTI)
-
बरसलेल्या जोरदार पावसामुळे दिमा हासाओ या भागातील रस्तेवाहतूक विस्कळीत झाली तर हाफलांग-सिलचर या रस्त्याचा काही भागच वाहून गेला. (Photo- PTI)
-
गुवाहातीमध्ये एका चारचाकीवर झाड कोसळून पडले त्यामुळे नुकसान झाले. (Photo- PTI)
-
सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडत असताना असेच एक झाड सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे स्कूल बसवर पडले त्यात १२ मुले जखमी झाली. दरम्यान, या घटनेमुळे मिझोरम आणि मेघालाय येथील शाळा काल(२८ मे) बंद ठेवण्यात आल्या होत्या. (Photo- PTI)
-
दरम्यान, आसाम राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी वादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरातच राहावे असे आवाहन त्यांच्या सोशल मीडियावरून केले. (Photo- PTI)
PHOTOS : ईशान्य भारताला रेमल चक्रीवादळाचा तडाखा: सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पावसानं घेतला २५ जणांचा बळी
रेमल चक्रीवादळ येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आधीच दिली होती. त्यानुसार वादळातून होणाऱ्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वादळाशी सामना करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती, स्वतः पंतप्रधान मोदी यांनी या तयारीचा आढावा घेतला होता.
Web Title: Cyclone remallatest photos an information northeast destruction deaths spl