-
पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. काल त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, त्यातील काही मंत्र्यांची विविध कारणांनी चर्चा होत आहे, ज्यामध्ये चंद्रशेखर पेम्मासानी यांचंही नाव आहे. त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. चंद्रशेखर आंध्रप्रदेशमधील गुंटूर या या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
आंध्र प्रदेशमध्ये १६ मतदारसंघात विजय मिळवलेल्या टीडीपीला २ मंत्रीपदं मिळाली आहेत. यामध्ये चंद्रशेखर आणि राममोहन नायडू यांचं नाव आहे. राममोहन नायडू यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
चंद्रशेखर पेम्मासानी हे खूपच श्रीमंत असे पुढारी आहेत. त्यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर चंद्राबाबू नायडू यांच्यापेक्षा चंद्रशेखर कित्येक पटीने जास्त श्रीमंत आहेत. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
चंद्राबाबू यांची संपत्ती ९३१ कोटी रुपये आहे तर टीडीपी खासदार आणि आता मंत्री झालेल्या चंद्रशेखर पेम्मासानी यांची एकूण संपत्ती ५ हजार ७०५ कोटी रुपये इतकी आहे. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीच्या वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण १६ कोटी ५३ लाख ६५ हजार ७० रुपये जमा आहेत. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
चंद्रशेखर यांनी सर्वात मोठी गुंतवणूक शेअर बाजारात केली आहे. त्यांनी आणि पत्नीने वेगवेगळ्या कंपनीचे बॉण्ड्स, डिबेंचर आणि शेअर बाजारातील कंपन्यामध्ये तब्बल ५ हजार ३५० कोटी रुपये गुंतवले आहेत. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
याशिवाय त्यांनी १८ कोटींहून अधिक रक्कमेच्या एलआयसी आणि इतर विमा कंपन्यांच्या पॉलिसी घेतल्या आहेत. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
तसेच चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्या नावे तेलंगणा, विजयवाडा आणि अमेरिकेत १०८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, ज्यामध्ये निवासी घर, अनिवासी इमारती, शेतजमीन आणि एन ए प्लॉट्स यांचा समावेश आहे. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB)
-
चंद्रशेखर यांनी १९९९ मध्ये एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्वेनिया मध्ये जाऊन मेडिकल सेंटरमधून इंटरनल मेडिसिन मध्ये एमडी ही पदवी प्राप्त केली आहे. (@Dr.Chandra Sekhar Pemmasani/FB) हेही पहा-PM Modi Cabinet 3.0 : नरेंद्र मोदी यांचे ३० शिलेदार; ‘हे’ आहे पंतप्रधानांचं केंद्रीय …
अबब! मोदींचा ‘हा’ कॅबिनेट मंत्री ५ हजार कोटींहून अधिक संपत्तीचा मालक; चंद्राबाबू नायडूंपेक्षाही अफाट श्रीमंत!
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये आंध्र प्रदेशच्या गुंटूर मतदार संघातील खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, चंद्रशेखर हे खूपच श्रीमंत पुढारी आहेत.
Web Title: Modi cabinet minister chandrababu naidu is nowhere near chandra shekhar pemmasani in terms of assets net worth is more than 500 crores spl