Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. what is salary of rahul gandhi as leader of opposition and other benefits spl

PHOTOS : विरोधीपक्षनेते राहुल गांधींचा पगार ३ लाख रुपये, सरकारी बंगल्यासह इतर कोणत्या सुविधा मिळणार?

Rahul Gandhi salary and facilities as leader of opposition : दहा वर्षांपासुन लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त होतं. सध्या लोकसभा अधिवेशन सुरु आहे. विरोधकांनी राहुल गांधींना विरोधी पक्षनेते म्हणून निवडले आहे. त्यानंतर राहुलना किती पगार मिळणार?, कोणता बंगला मिळणार? तसेच इतर काय सुविधा मिळणार? याबद्दल लोक चर्चा करताना दिसत आहेत.

Updated: June 26, 2024 19:22 IST
Follow Us
  • rahul gandhi facilities
    1/9

    राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. (Indian Express)

  • 2/9

    लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद १० वर्षांपासून रिक्त होते. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस ९९ जागांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधीना ताकद मिळाली आहे.

  • 3/9

    २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राहुल गांधी पहिल्यांदाच घटनात्मकपद भूषवणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कोणत्या सुविधा मिळतील आणि त्यांचा पगार काय असेल ते जाणून घेऊया.

  • 4/9

    राहुल गांधींना दिल्लीतील लुटियन झोन परिसरातील मंत्री वसाहतीमध्ये एक प्रशस्त मागे आणि पुढे मोठा बगीचा असलेला बंगला मिळणार आहे. यासह ४ नोकर, २ गॅरेज, १ चारचाकी चालक असेल.

  • 5/9

    राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली असून विरोधी पक्षनेत्याचा दर्जा घटनात्मकदृष्ट्या कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीचा मानला जातो. कॅबिनेट मंत्र्यांना केंद्रात टाइप ८ (८२५० चौरस फूट) बंगले मिळतात.

  • 6/9

    राहुल गांधींना मिळणाऱ्या सरकारी बंगल्यात ७ मोठ्या खोल्या असतील, ज्यात ड्रॉइंग रूम, लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, बेडरूम तसेच ४ बाथरूम असतील.

  • 7/9

    राहुल गांधी विरोधीपक्षनेते पदावर असले तरी त्यांचा पगार केंद्रीय मंत्र्याएवढा असेल. यासोबतच भत्ते आणि इतर सुविधाही त्यांना मिळणार आहेत.

  • 8/9

    लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला दरमहा ३ लाख ३० हजार रुपये पगार मिळतो. याशिवाय दरमहा १ हजार रुपये आदरातिथ्य भत्ता आणि १४ जणांचा कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपलब्ध असतो.

  • 9/9

    याशिवाय कॅबिनेट मंत्र्यासारखीच राहुल गांधींनाही उच्चस्तरीय सुरक्षा मिळेल. याशिवाय त्यांना मोफत विमान प्रवास, रेल्वे प्रवास आणि इतर अनेक सुविधा मिळणार आहेत. (हेही पहा- PHOTOS : ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी! पहा त्यांची नव्या आणि जुन्या संसदेतील खास छायाचित्रे)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: What is salary of rahul gandhi as leader of opposition and other benefits spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.