• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uk prime minister sunak at london neasden temple on campaign invokes bhagavad gita says hindu dharma guides his approach spl

Britain Election 2024 : निवडणुकीच्या वातावरणात ऋषी सुनक लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात! पाहा भव्य मंदिराची छायाचित्रे

निवडणुकीच्या वातावरणात राजकीय पुढारी धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणार नाहीत, असे कसे होईल? भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक यांनीही हीच परंपरा पाळत लंडनमधील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आहे.

Updated: July 1, 2024 13:11 IST
Follow Us
  • Britain Election 2024
    1/9

    ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी यावर्षी ४ जुलै रोजी निवडणूक होत आहे. अशा परिस्थितीत तिथले सर्वच राजकारणी मतदारांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. (फोटो: रॉयटर्स)

  • 2/9

    दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटी लंडनमधील प्रतिष्ठित बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात प्रार्थना केली. (फोटो: रॉयटर्स)

  • 3/9

    या मंदिराला नेसडेन मंदिर म्हणूनही ओळखले जाते. स्वामीनारायण मंदिराला ब्रिटनमधील पहिले अस्सल हिंदू किंवा सनातन मंदिर म्दहणून दर्जा मिळाला आहे. (फोटो: रॉयटर्स)

  • 4/9

    या मंदिराची स्थापना १९९५ मध्ये श्री प्रधान स्वामी महाराजांनी केली होती. हे मंदिर हाताने कोरलेल्या इटालियन कॅरारा संगमरवरी आणि बल्गेरियन चुन्याच्या दगडांनी बनवलेले आहे (फोटो: रॉयटर्स)

  • 5/9

    ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती या भव्य मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर उपस्थित लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर दोघांनी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पूजा केली. (फोटो: रॉयटर्स)

  • 6/9

    ऋषी सुनक यांनी मंदिर परिसराचा फेरफटका मारल्यानंतर, स्वयंसेवक आणि समाजाच्या नेत्यांशी बोलतांना उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या धर्मातून मिळालेल्या प्रेरणांबद्दल सांगितले. (फोटो: रॉयटर्स)

  • 7/9

    ते म्हणाले, “मी एक हिंदू आहे आणि तुम्हा सर्वांप्रमाणे मलाही माझ्या धर्मातून प्रेरणा आणि ताकद मिळते. मी भगवद्गीतेवर हात ठेऊन खासदार म्हणून शपथ घेताल्याचा मला अभिमान वाटतो.” (फोटो: एपी)

  • 8/9

    ऋषी सुनक पुढे म्हणाले, “आपला धर्म आपल्याला आपले कर्तव्य पार पाडण्यास शिकवतो तसेच केलेल्या कामांच्या परिणामांची चिंता करण्याची आवश्यकता भासत नाही अशी शिकवण देतो. फक्त ते काम प्रामाणिकपणे केलेले असावे लागते” (फोटो: एपी)

  • 9/9

    ते पुढे म्हणाले, “जे माझ्या आई वडिलांनी मला शिकविले तेच मी माझ्या मुलींना शिकवणार आहे. माझ्या सार्वजनिक जीवनाला जगत असताना मला मार्गदर्शन करणारा हा माझा धर्म आहे” (फोटो: पीटीआय)
    (हे देखील वाचा: PHOTOS : विजेत्या भारतीय संघाशी पंतप्रधान मोदींचा संवाद; प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं…)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Uk prime minister sunak at london neasden temple on campaign invokes bhagavad gita says hindu dharma guides his approach spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.