-
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकाल जाहीर झाले आहेत.
-
मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात ही निवडणूक झाली होती.
-
मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती.
-
याठिकाणी अनिल पराब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आहे.
-
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
-
येथे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत झाली.
-
मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात होते.
-
याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांना मतदारांनी विजयी केले आहे.
-
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीला यश मिळाले आहे. येथे किशोर दराडे विजयी झाले आहेत.
नाशिक मध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळाली. या लढतीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. -
नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विरुद्ध ठाकरे गटाचे संदीप गुळवे अशी लढत झाली. हेही पहा- PHOTOS : अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने! वाचा काय घडलं?
PHOTOS : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांचा निकाल काय लागला, कोणी मारली बाजी? वाचा माहिती
मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत.
Web Title: Vidhan parishad election result 2024 graduate and teachers member of legislative council mlc seats election result spl