-
राज्यात सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा लागली आहे.
-
सर्व पक्षांकडून आता त्यानुसार तयारी करण्यात येत आहे. विविध रणनीती आखल्या जात आहेत.
-
त्यातच आता शिवसेना शिंदे गटानेही तयारीला सुरुवात केली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल (२ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर मध्ये एक दौरा आयोजित करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा गटानेही एक सभा येथे आयोजित केली होती, उद्धव ठाकरेंनी या सभेला उपस्थिती लावली होती.
-
या दौऱ्यात संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
-
संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर यावेळी झालेल्या शक्तीप्रदर्शनात सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
-
यावेळी महिला सशक्तीकरण, लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला.
-
यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जागोजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आले.
-
मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते.
-
यावेळी महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंना राख्याही बांधल्या.
-
(सर्व फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेसबुक पेजवरून साभार)
Photos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संभाजीनगरमधील सिल्लोड येथे जोरदार स्वागत, लाडकी बहीण योजनेचा केला प्रचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संभाजीनगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
Web Title: Cm eknath shinde at sillod sambhajinagar see photos spl