-
बांगलादेश सध्या श्रीलंकेच्या वाटेवर आहे. काही काळापूर्वी श्रीलंकेतही असाच सत्तापालट झाला होता. आता बांगलादेश हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. बांगलादेशात सध्या सर्वत्र गर्दी आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भारतात आल्या आहेत. बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना यांच्याबाबत जगभरात अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान, त्यांचा एक नोकरही चर्चेत आहे, त्याच्याकडील संपत्ती जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (पीटीआय)
-
शेख हसीना यांच्या नोकराची संपत्ती जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या नोकराच्या तुलनेत शेख हसीना यांची संपत्ती खूपच कमी आहे. (Sheikh Hasina/Insta)
-
काही काळापूर्वी एक बातमी आली होती की शेख हसीना यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराची एकूण संपत्ती २८४ कोटी रुपये आहे. (Sheikh Hasina/Insta)
-
ही बाब उघडकीस येताच शेख हसीना यांनीही चौकशीचे आदेश दिले. जहांगीर आलम असे त्यांच्या घरी काम करणाऱ्या या नोकराचे नाव आहे. (पीटीआय)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचा नोकर सध्या अमेरिकेत राहतो. मात्र, त्यांच्या नोकराला एवढी संपत्ती मिळाली कुठून?, याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Sheikh Hasina/Insta)
-
२०२४ च्या सुरुवातीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान शेख हसीना यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, त्या एकूण ४.३६ कोटी बांगलादेशी टका (३.१४ कोटी भारतीय रुपये) च्या मालक आहेत. (Sheikh Hasina/Insta)
-
अशा स्थितीत पाहिले तर शेख हसीना यांचा नोकर जहांगीर आलम हा त्यांच्यापेक्षा खूप श्रीमंत आहे. (Sheikh Hasina/Insta)
-
बांगलादेशात सध्या अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या घरांची, दुकानांची आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड करण्यात आली आहे. (पीटीआय)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशातील सुमारे २७ जिल्ह्यांमध्ये जमावाने हिंदूंच्या घरांवर आणि व्यावसायिक संकुलांवर हल्ले केले आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. (Reuters)
शेख हसीना यांच्यापेक्षा श्रीमंत आहे त्यांचा नोकर?; मालमत्तेत जमीन आस्मानाचा फरक, वाचा माहिती
Sheikh Hasina Servant Richer than Her: हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. वाढता विरोध पाहून शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्या भारतात आल्या. दरम्यान, त्यांचा एक नोकर चर्चेत आहे..
Web Title: Bangladesh sheikh hasina servant richer than her net worth and property will be surprised you spl