-
पाकिस्तान सध्या भीतीच्या सावटाखाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेमुळे पाकिस्तानी सैन्य आणि सरकारमध्ये घबराट निर्माण झाली आहे. (Photo: PTI)
-
पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर भारत कधीही मोठी कारवाई करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये एक मोठा लष्करी बदल झाला आहे. (Photo: PTI)
-
पाकिस्तानचे नवे एनएसए कोण आहेत?
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, मलिक यांची आयएसआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांना एनएसएचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. (Photo: ANI) -
वडीलही सैन्यात होते
लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांचे वडील गुलाम मोहम्मद मलिक हेदेखील माजी पाकिस्तानी लष्करी अधिकारी होते. सैन्यात असताना त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तान-भारत युद्धांमध्ये भाग घेतला होता. (Photo: Indian Express) -
वडिलांनी पाकिस्तानसाठी दोन युद्धे लढली
गुलाम मुहम्मद मलिक हे पाकिस्तानी सैन्याच्या रावळपिंडी येथील १० व्या कॉर्प्सचे प्रमुख होते. मलिक १९९५ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले, त्यानंतर ते एक एनजीओ चालवत आहेत. त्यांच्या एनजीओचे मुख्य उद्दिष्ट पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये गरिबांसाठी रुग्णालये आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे. (Photo: Indian Express) -
सुशिक्षित अधिकारी
लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर ते एक अतिशय सुशिक्षित पाकिस्तानी अधिकारी आहेत. त्यांनी १९९९ मध्ये बलुचिस्तान विद्यापीठातून बीएससी (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. (Photo: PTI) -
अमेरिकेतही शिक्षण घेतले
पुढील अभ्यासासाठी ते अमेरिकेला गेले आणि तेथे त्यांनी फोर्ट लीव्हनवर्थ येथे पर्वतीय युद्ध (माउंटन वॉरफेअर: द नीड फॉर स्पेशलिस्ट ट्रेनिंग) या विषयावर प्रबंध लिहिला. (Photo: Chief of Army Staff Pakistan Army/FB) -
पीएचडी संपादन केली
यानंतर, मलिक यांनी यूकेमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमध्येही शिक्षण घेतले. मलिक यांनी अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठातून पीएचडी संपादन केली. (Photo: Chief of Army Staff Pakistan Army/FB) -
यासोबतच, लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांनी पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या ८० व्या लाँग कोर्समधून पदवी प्राप्त केली आहे जिथे त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (Photo: Chief of Army Staff Pakistan Army/FB)
-
पाकिस्तानी सैन्यात कधी सामील झाले?
लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक १९८९ मध्ये पाकिस्तानी सैन्यात सामील झाले. त्या काळात त्यांना १२ व्या बलुच रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले. (Photo: Chief of Army Staff Pakistan Army/FB) -
लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक हे आयएसआयचे महासंचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले पीएचडीधारक आहेत. यापूर्वी, या पदावर असलेला कोणताही अधिकारी पीएचडीधारक नव्हता. (Photo: Chief of Army Staff Pakistan Army/FB)
पाकिस्तानच्या लष्कारात मोठे फेरबदल; भारताविरोधात युद्ध लढलेल्या अधिकाऱ्याच्या मुलावर दिली महत्त्वाची जबाबदारी
पाकिस्तानचे एनएसए मोहम्मद असीम मलिक कोण आहेत: आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची पाकिस्तानचे नवे एनएसए म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे वडीलही सैन्यात होते आणि त्यांनी दोन युद्धे लढली आहेत. मलिक हा उच्चशिक्षित लष्करी अधिकारी आहे.
Web Title: Who is pakistans new nsa lieutenant general mohammad asim malik his father has fought two wars kvg