• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. air india ahmedabad plane crash flight attendant roshni songhare influencer story photos sdn

Air India Plane Crash: हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न, शिक्षण..; डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते.

Updated: June 13, 2025 11:26 IST
Follow Us
  • Roshni Songhare Flight Attendant Air India Ahmedabad Plane Crash
    1/15

    Ahmedabad Plane Crash Meghaninagar: अहमदाबादहून लंडन (London) गॅटविकला जाणारे विमान एआय-१७१ (Air India flight AI171) उड्डाणानंतर तीन मिनिटांनी विमानतळाच्या (Sardar Vallabhbhai Patel International Airport) सीमेजवळ कोसळले.

  • 2/15

    अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते.

  • 3/15

    त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

  • 4/15

    एअर इंडियाच्या विमान अपघातात डोंबिवलीतील (Dombivli, Maharashtra) २७ वर्षाच्या हवाई सुंदरीचा समावेश आहे.

  • 5/15

    रोशनी राजेंद्र सोनघरे (Flight Attendant Roshni Songhare) असे या हवाई सुंदरीचे नाव आहे.

  • 6/15

    या विमानात इतर सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर (कृ मेंबर) हवाई सुंदरी म्हणून रोशनी सोनघरे हिचे कर्तव्य होते.

  • 7/15

    डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील मढवी बंगल्याच्या पाठीमागील भागातील न्यू उमिया कृपा सोसायटीत रोशनी आपले आई, वडील आणि भाऊ यांच्यासह राहत होती.

  • 8/15

    मनमिळाऊ स्वभावाची, शालेय जीवनात हुशार असलेल्या रोशनीचे हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न होते. ते तिने शिक्षण पूर्ण करून साध्य केले होते.

  • 9/15

    एअर इंडियात विमानात कर्तव्यावर जाताना ती गणवेशात जात होती, असे ती राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले.

  • 10/15

    ‘स्काय लव्हर हर’ (Sky Loves Her) या नावाने ती इन्स्टाग्रामवर इन्फ्लुअन्सर होती. तिचे ५६ हजार फॉलोअर्स होते.

  • 11/15

    सोनघरे कुटुंबीय यापूर्वी मुंबईत वास्तव्याला होते.

  • 12/15

    दोन वर्षापूर्वी ते डोंबिवलीत स्थलांतरित झाले, असे त्यांच्या परिचितांनी सांगितले.

  • 13/15

    रोशनी अलीकडेच एअर इंडियाच्या सेवेत दाखल होती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : रोशनी सोनघरे/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : एअर इंडियाचे विमान कोसळलं; BJ मेडिकल हॉस्टेलची इमारत खचली, फोटो व्हायरल)

TOPICS
अहमदाबादAhmedabadएअर इंडियाAir Indiaविमान अपघातPlane Crash

Web Title: Air india ahmedabad plane crash flight attendant roshni songhare influencer story photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.