• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister narendra modi at g7 canada top moments svk

Photos: पंतप्रधान मोदी कॅनडामध्ये; G7 परिषदेतील महत्त्वाचे क्षण आणि चर्चेचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी७ शिखर परिषदेच्या निमित्ताने जर्मनी, कॅनडा आणि इटलीच्या नेत्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठका घेतल्या. पंतप्रधान मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचा पुढचा मुक्काम क्रोएशिया आहे.

June 18, 2025 16:38 IST
Follow Us
  • G7 Summit: Key highlights from PM Modi's engagements in Canada | See pictures
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅलगरी येथे पोहोचले. त्यांनी स्पष्ट केले की, भारत जागतिक दक्षिणेच्या गरजा आणि प्राधान्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठोसपणे मांडेल.
    शिखर परिषदेदरम्यान मोदींनी जर्मनी, कॅनडा आणि इटलीच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केल्या. “या परिषदेत विविध देशांच्या नेत्यांशी संवाद साधून ते जागतिक स्तरावर महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत. असं मोदींनी बैठकीपूर्वी सांगितलं.(छायाचित्र स्रोत – X)

  • 2/10

    G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट विशेष चर्चेचा विषय ठरली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांमधील राजनैतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.
    जगभरातून या मैत्रीपूर्ण संबंधांचे कौतुक होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर दोघांची केमिस्ट्रीही चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. (छायाचित्र स्रोत – X)

  • 3/10

    G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांची दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यासोबत विशेष भेट. (छायाचित्र स्रोत – X)

  • 4/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारत-कॅनडा संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. २०२३ नंतर प्रथमच दोन्ही देशांमध्ये नवीन उच्चायुक्ताची नियुक्ती झाली आहे. (छायाचित्र स्रोत – X)

  • 5/10

    कनानास्किस, कॅनडा येथे झालेल्या G7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली. (छायाचित्र स्रोत – X)

  • 6/10

    G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी भेट घेतली. या बैठकीत व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि दहशतवादविरोधी सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.(छायाचित्र स्रोत – X)

  • 7/10

    कॅनडातील कानानस्किस येथे झालेल्या ५१ व्या G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांच्याशी सौहार्दपूर्ण भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. (छायाचित्र स्रोत – एक्स)

  • 8/10

    कॅनडामधील G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी संवाद साधला. या भेटीत दोन्ही नेत्यांनी विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत-जपान भागीदारी अधिक दृढ करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली. (छायाचित्र स्रोत – X)

  • 9/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीयर स्टारमर यांची भेट झाली, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी भारत-ब्रिटन व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. (छायाचित्र स्रोत – X)

  • 10/10

    कॅनडामध्ये झालेल्या ५१ व्या G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली. (छायाचित्र स्रोत – X)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Prime minister narendra modi at g7 canada top moments svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.