• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. in photos london rocked by tommy robinsons unite the kingdom protest fehd import rak

टॉमी रॉबिन्सन यांच्या ‘युनाईट द किंगडम’ आंदोलनाने लंडन हादरले, पाहा PHOTO

अतिउजवे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या "युनाईट द किंगडम" मार्चला १,००,००० हून अधिक समर्थक आले तेव्हा लंडनचे रस्ते राष्ट्रवादी घोषणांनी आणि युनियन जॅकने गजबजून गेले.

September 14, 2025 16:31 IST
Follow Us
  • London protests in pictures
    1/11

    १३ सप्टेंबर २०२५ रोजी लंडनमध्ये अतिउजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली ‘युनाईट द किंगडम’ रॅलीमध्ये ११०,००० हून अधिक लोक सहभागी झाले होते. ही यूकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या उजव्या विचारसरणीच्या निदर्शनांपैकी एक ठरले आहे. हा मोर्चा स्थलांतरविरोधी आणि राष्ट्रवादी विषयांवर केंद्रित होता आणि यामध्ये समर्थकांनी इंग्रजी आणि ब्रिटिश झेंडे घेऊन, ‘सेंड देम होम’ अशा घोषणा देत होते. पोलिस आणि काउंटर प्रोटेस्टर्स यांच्या झालेल्या संघर्षात २६ अधिकारी जखमी झाले आणि २५ जणांना अटक करण्यात आली. तर रॉबिन्सन यांनी या रॅलीचे वर्णन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्सव आणि अनियंत्रित स्थलांतर आणि राजकीय अपयशांविरुद्धचा निषेध असे केले.

  • 2/11

    पोलिसांनी सांगितले की अधिकाऱ्यांना बुक्क्या, लाथा आणि बाटल्यांनी मारहाण करण्यात आली. (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 3/11

    आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 4/11

    तर दुसरीकडे मार्च अगेन्स्ट द फॅसिझम या रॅलीमध्ये ५०० लोक सहभागी झाले होते. (Photo source: AP)

  • 5/11

    रॉबिन्सन यांनी आरोप केला की स्थानिक नागरिकांपेक्षा स्थलांतरितांना यूके न्यायालयांमध्ये जास्त अधिकार आहेत. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

  • 6/11

    यावेळी निदर्शकांनी हातात घेतलेल्या फलकांवर ‘स्टॉप द बोट्स’ आणि ‘सेव्ह आवर चिल्ड्रन’ अशा घोषणा लिहिण्यात आलेल्या होत्या. (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 7/11

    बिग बेन ते वॉटरलू पर्यंत जवळजवळ एक किलोमीटरचा हा मोर्चा होता. (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 8/11

    एरिक झेमोर यांनी स्थलांतराचे वर्णन करताना त्याचा उल्लेख ‘कॉलनायझेशन बाय फॉर्मर कॉलनिज’ असे केले. (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 9/11

    या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात झेंडे घेतल्याचे पाहायला मिळाले, (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 10/11

    जरी या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांची संख्या मोठी असली तरी, २०२३ साली झालेल्या पॅलेस्टिनी समर्थक रॅलीपेक्षा ती कमी होती, त्या रॅलीमध्ये ३,००,००० लोक सहभागी झाले होते. (छायाचित्र स्रोत: एपी)

  • 11/11

    या आंदोलनादरम्यान अमेरिकेत गोळी घालून हत्या करण्यात आलेल्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती, पुराणमतवादी, उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते चार्ली कर्क (वय ३१)  यांच्या सन्मानार्थ काही क्षण मौन पाळण्यात आले. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsलंडनLondon

Web Title: In photos london rocked by tommy robinsons unite the kingdom protest fehd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.