-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. त्यांची पुन्हा चर्चा होते आहे ती म्हणजे किंग्ज चार्ल्स यांनी दिलेल्या जंगी मेजवानीमुळे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दुसरा राजकीय दौरा आहे.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किंग चार्ल्स हे खास बग्गीतून विंडसर कॅसल या ठिकाणी पोहचले तो क्षण (सर्व-छायाचित्रांचं सौजन्य- एपी)
-
सेंट जॉर्ज हॉल या ठिकाणी जंगी मेजवानी पार पडली. या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्याच. शिवाय मेजवानीचा थाटही राजेशाही होता.
-
मेलानिया ट्रम्प यांनी ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता आणि राणी कॅमिला संध्याकाळी पांढऱ्या आणि मोती रंगाच्या पोशाखात होत्या.
-
राजकुमारी कॅथरीनने सोनेरी लेसचा गाऊन घातला होता. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
या जंगी मेजवानीत ओपन एआयचे सॅम ऑल्टमन, अॅपलचे टिम कुक आणि एनव्हीडियाचे जेन्सेन हुआंग यांच्यासह दिग्गजांचा सहभाग होता.
-
या खास मेजवानीसाठी रुपर्ट मर्डोक आणि त्यांची पत्नी एलेना झुकोवाही विंडसर या ठिकाणी उपस्थित होते.
-
किंग चार्ल्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात डीनर डिप्लोमसी पार पडली. दरम्यान खास ब्रिटिश पदार्थांचा या डीनरमध्ये समावेश होता. तसंच विंटेज वाईनने या मेजवानीची रंगत वाढवली.
-
डोनाल्ड ट्रम्प यांना ही शाही मेजवानी फारच आवडली. माझ्या आयुष्यातल्या सर्वोच्च सन्मानापैकी एक सन्मान असं डोनाल्ड ट्रम्प या मेजवानी आणि पाहुणचाराबाबत म्हणाले.
-
केयर स्टारमर यांच्याशी व्यावसायिक चर्चा पार पडल्या. तसंच २०५ अब्ज अमेरिकेन डॉलर्सच्या गुंतवणुकीवरही शिक्कामोर्तब झालं.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (मध्यभागी) आणि वेल्सच्या केट हे विंडसर कॅसलमध्ये स्टेट बँक्वेट दरम्यान ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचं भाषण ऐकत होते तो क्षण
-
इंग्लंड येथील विंडसर कॅसल या ठिकाणी स्टेट बँक्वेटमध्ये ब्रिटनचे किंग चार्ल्स, राजकुमारी केट आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्र टोस्ट करतानाचा खास क्षण
-
या खास मेजवानीसाठी अनेक पाहुणे उपस्थित होते तसंच विविध क्षेत्रातले दिग्गजही आले होते.
-
किंग जॉर्ज आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेजवानीचं टेबल हे खास पद्धतीने सजवण्यात आलं होतं.
-
इस्रायल, रशिया आणि जागतिक सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चेच्या आधी ही जंगी मेजवानी पार पडली आहे. यामुळे एक प्रकारे सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी किंग्ज चार्ल्स यांनी दिली जंगी मेजवानी, डोळ्यांचं पारणं फेडणारा राजेशाही थाट पाहिलात का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनमध्ये सन्मान करण्यात आला. किंग चार्ल्स यांनी दिलेली जंगी मेजवानी दोन देशांमधले संबंध दृढ करणारी ठरली आहे.
Web Title: Pomp pageantry and politics king charles royal state banquet for donlad trump in photos fehd import scj