-

युद्ध या चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच समारंभ नुकताच कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
-
या चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय आहेत व ती रसिकांना नक्कीच आवडतील असा विश्वास निर्माते शेखर गिजरे यांनी याप्रसंगी बोलून दाखवला
-
चित्रपटातील मुख्य कलाकार राजेश शृंगारपुरे कॅमे-यास पोझ देताना.
-
चित्रपटातील मुख्य कलाकार जस्विनी पंडित.
-
या चित्रपटात एकूण चार गीते असून ती जाफर सागर यांनी लिहिली आहेत. या गीतांना विवेक कार यांचे संगीत लाभले आहे.
-
युद्धची टीम सेल्फी काढताना.
‘चल दूर दूर’, ‘देवा सांगना’, ‘देवा गणेशा’, अनप्लग ‘चल दूर दूर’ अशा चार गीतांची मेजवानी या चित्रपटात आहे. या गीतांना आदर्श शिंदे, स्वाती शर्मा, प्रताप, देव नेगी यांच्या स्वराचे कोंदण लाभले आहे. -
शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई हा सिनेमा बोकाळलेला भ्रष्टाचार, अत्याचार त्यात सर्वसामान्य माणसाची होणारी ससेहोलपट, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग यावर भाष्य करतो.
-
यावेळी विविध कलाकारांनीही उपस्थिती लावली होती.
-
राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
-
श्रद्धा एंटरटेण्मेंटची निर्मिती असलेला हा सिनेमा १५ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय.
‘युद्ध’चा शानदार म्युझिक लाँच
Web Title: Dazzling music launch of the film yudh