• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. who is god woman radhe maa

‘बब्बो’ ते ‘राधे माँ’

काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ हिच्याविरोधात तिच्याच भक्ताने तक्रार दाखल होती. बोरिवलीत मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबियातील सुनेने राधे माँने आपला हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेले अनेक दिवस राधे माँ सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ही राधे माँ नक्की आहे तरी कोण, तिची पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू…

Updated: October 6, 2021 14:39 IST
Follow Us
  • काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ हिच्याविरोधात तिच्याच भक्ताने तक्रार दाखल होती. बोरिवलीत मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबियातील सुनेने राधे माँने आपला हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेले अनेक दिवस राधे माँ सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ही राधे माँ नक्की आहे तरी कोण, तिची पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे.
    1/10

    काही दिवसांपूर्वी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ हिच्याविरोधात तिच्याच भक्ताने तक्रार दाखल होती. बोरिवलीत मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबियातील सुनेने राधे माँने आपला हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गेले अनेक दिवस राधे माँ सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ही राधे माँ नक्की आहे तरी कोण, तिची पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

  • 2/10

    राधे माँ चे मूळ नाव बब्बो असून ती मुळची पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील राहणारी आहे.

  • 3/10

  • 4/10

    सुरूवातीच्या काळात तिचे वैवाहिक जीवन व्यवस्थितपणे सुरू होते. मात्र, काही काळानंतर एका मंदिरात राधे माँ ची महंत श्री रामदीन दास यांच्याशी भेट झाली. त्यानंतर बब्बोने राधे माँ ही नवी ओळख धारण केली.

  • 5/10

    त्यानंतर राधे माँ तिच्याकडे येणाऱ्या लोकांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करू लागली. राधे माँ ला कडेवर घेऊन नाचल्यास समृद्धी येते असा प्रचार, तिच्या भक्तांकडून करण्यात येतो. विशेष म्हणजे राधे माँ भक्तांशी स्वत: बोलत नाही. तिच्यामार्फेत टल्ली बाबा नावाची व्यक्ती भक्तांशी बोलते.

  • 6/10

    गेल्या काही वर्षांत भारतातील प्रमुख शहरांसह देश-विदेशात झालेल्या कार्यक्रमांमुळे राधे माँ खूप मोठ्याप्रमाणावर नावारूपाला आली. राधे माँ दुर्गेचा अवतार असल्याचा दावा तिच्या भक्तांकडून करण्यात येतो. राधे माँ कोणाशीही बोलत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे प्रवचन देत नाही. ती फक्त आपल्या नजरेने भक्तांशी संवाद साधते.

  • 7/10

    मुंबईतील बोरिवली भागात अनेकदा राधे माँचा अलिशान दरबार भरला आहे. या दरबारात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. राधे माँ एखाद्या भक्तावर प्रसन्न झाल्यावर ती नाचत नाचत भक्ताच्या कडेवर बसते. राधे माँ ला कडेवर घेऊन नाचल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते.

  • 8/10

    राधे माँ बहुतेकदा भडक लाल रंगाचे कपडे किंवा वधुचा पोशाख परिधान करते.

  • 9/10

    भक्तांना भेटायला आल्यानंतर राधे माँ व्यासपीठावर नाचत राहते.

  • 10/10

    राधे माँ दुर्गेचा अवतार असल्याचा दावा तिच्या भक्तांकडून करण्यात येतो.

TOPICS
राधेमाRadhe Maa

Web Title: Who is god woman radhe maa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.