• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. haji ali dargah

हाजी अली दर्गा – सागरातील अलौकिक स्मारक

‘हाजी अली दर्गा’ ही वास्तू भर समुद्रात दिमाखात उभी आहे. भर समुद्रात उभारलेली देशातील एकमेव वारसावास्तू.

April 28, 2016 16:59 IST
Follow Us
  • जागतिक कीर्तीच्या मुंबई महानगरीची शान, ऐट वाढविण्यात ज्या अनेक वारसावास्तू आहेत त्यात हिंदू, ख्रिश्चन, पारसी, ज्यू समाजाच्या धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या वास्तूंच्या पंक्तीत ‘हाजी अली दर्गा’ ही वारसावास्तू समुद्राच्या एका छोटय़ा बेटावर उभी आहे.
    1/

    जागतिक कीर्तीच्या मुंबई महानगरीची शान, ऐट वाढविण्यात ज्या अनेक वारसावास्तू आहेत त्यात हिंदू, ख्रिश्चन, पारसी, ज्यू समाजाच्या धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या वास्तूंच्या पंक्तीत ‘हाजी अली दर्गा’ ही वारसावास्तू समुद्राच्या एका छोटय़ा बेटावर उभी आहे.

  • 2/

    इस्लामिक वास्तुशैलीचे हाजी अली दर्गा हे प्रार्थनास्थळ मुंबई महानगरीचे प्रमुख आकर्षण आहे. या दर्ग्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे. या जुन्या प्रार्थनास्थळावर मुघल व इंडो-इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव आहे.

  • 3/

    दर्ग्याच्या बांधकामाने सुमारे ४,५०० चौ. मीटर इतकी जागा व्यापलेली असून हे बांधकाम सुमारे ८५ फूट उंचीचे आहे. दग्र्यामध्ये प्रवेश केल्यावर व बाहेरील बाजूस नजर टाकल्यावर या वास्तूच्या भव्यतेची कल्पना येते.

  • 4/

    ‘हाजी अली दर्गा’ ही वास्तू भर समुद्रात दिमाखात उभी आहे. आपल्या देशात भर समुद्रात उभारलेली ही एकमेव वारसावास्तू आहे. इतकेच नव्हे तर भारताचे प्रवेशद्वार ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या आकर्षक वास्तूप्रमाणे ही वास्तू म्हणजे मुंबई शहराची ओळखच झाली आहे. (छाया – वसंत प्रभू)

  • 5/

    सागराचे बदलते स्वरूप आणि निसर्गराजाच्या बदलत्या वातावरणातही ही वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहे. यातून वास्तुविशारदांच्या दूरदृष्टीसह त्यांचा बांधकामातील अभ्यास जाणवतो.

  • 6/

    समुद्रावरील भलेभक्कम खडकावर हे बांधकाम उभारले आहे. मूळच्या बांधकामाचे पावित्र्य राखून त्याला आकर्षक चेहरा देण्यासाठी १९१६ मध्ये स्थापन झालेल्या विश्वस्तांची कल्पकता जाणवते.

  • प्रत्यक्ष दर्ग्याकडे जाण्यासाठी सुमारे ५०० मीटर लांबीचा काँक्रीटचा भक्कम रस्ता आहेच. हा रस्ता स्वातंत्र्यपूर्वकाळात १९४४ साली बांधला गेला. मात्र या पायवाटेनी जाण्यासाठी समुद्राच्या भरती-ओहोटीचे वेळापत्रक सांभाळावे लागते, कारण भरतीच्या वेळी हा मार्ग पाण्याखाली जातो.
  • 7/

    आपल्याकडील कोणत्याही धार्मिक स्थळी भाविकांना आवश्यक असलेल्या वस्तूंची विक्री करणारे असतात तसे विक्रेते येथेही आहेतच. दर्ग्याची छायाचित्रे, दर्ग्यासंबंधी सविस्तर माहिती सांगणाऱ्या सीडी, पुस्तके, फुलविक्रेत्यांचा त्यात समावेश आहे.

  • 8/

    दर दिवशी सुमारे १० ते १५ हजार भाविक पर्यटक या प्रार्थनास्थळाला भेट देत असतात, तर रमझान, ईद तसेच रविवार या सुट्टीच्या दिवशी ही संख्या लाखांच्या घरात जाते. अनेक क्षेत्रातील कलाकारही येथे नेहमी भेट देत असतात.

TOPICS
हाजी अली दर्गाHaji Ali Dargah

Web Title: Haji ali dargah

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.