Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. when kashmiri pandits kicked out from kashmir bmh

१९ जानेवारी : काश्मिरी पंडितांची भळभळती जखम

एका रात्रीत काश्मिरी पंडित बेघर झाले

January 19, 2020 19:45 IST
Follow Us
  • काश्मीरला कितीतरी विशेषण लावून गौरवलं जातं. पृथ्वीवरचा स्वर्ग. भारताच नंदनवन वगैरे. पण, काश्मीरची दुसरी बाजू म्हणजे भळभळत्या जखमा. अशीच एक जखम आहे, १९९०मधील. ही दुसरी फाळणीच होती. काश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे. असा फतवाच निघाला आणि काश्मीरातील पंडितांना वाडवडलांची भूमी सोडून शरणार्थींचं जीवन जगावं लागलं. त्याला आता जवळपास तीस वर्ष होत आहे.
    1/9

    काश्मीरला कितीतरी विशेषण लावून गौरवलं जातं. पृथ्वीवरचा स्वर्ग. भारताच नंदनवन वगैरे. पण, काश्मीरची दुसरी बाजू म्हणजे भळभळत्या जखमा. अशीच एक जखम आहे, १९९०मधील. ही दुसरी फाळणीच होती. काश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे. असा फतवाच निघाला आणि काश्मीरातील पंडितांना वाडवडलांची भूमी सोडून शरणार्थींचं जीवन जगावं लागलं. त्याला आता जवळपास तीस वर्ष होत आहे.

  • 2/9

    १९९० च्या जानेवारीत काय झाले? ‘काश्मीर आमचे म्हणजे मुस्लिमांचे आहे. ‘आम्हाला आमचा पाकिस्तान पाहिजे तुम्हा पुरुषांवाचून, तुम्ही इथून निघून जा, फक्त तुमच्या बायका इथे ठेवा.’ अशा अपमानजनक, मानहानीकारक घोषणांनी वातावरण दूषित झालं होतं.

  • 3/9

    सर्वत्र फलक, घोषणा लिहिल्या गेल्या होत्या. अर्थात हे काही एका रात्रीत झालं नव्हतं. त्या अगोदरपासूनच पंडितांना धमक्या येत होत्या. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आपलं घरदार, वाडवडलांची भूमी, व्यवसाय, नोकऱ्या सोडून का नि कुठं जायचं? पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली.

  • 4/9

    ‘आमचा गुन्हा काय?’ या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे कुणाकडेच नाही. त्या रात्री काय झालं हे आठवलं तरी आजही त्यांच्या अंगावर काटा येतो. जेव्हा आपल्यांनीही दगाफटका केला तेव्हा ज्या काश्मीरीयतबद्दल अभिमान होता, ती विखरून गेली. उद्ध्वस्त झाली.

  • 5/9

    हे सारं का होत होतं? तर ते हिंदू होते म्हणून. हे सत्य आपल्यासारख्या सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्यांनाही (सेक्युलरवाद्यांना) नाकारता येत नव्हतं. ते नि:शस्त्र होते नि आजही तसेच आहेत.

  • 6/9

    ते जगत नव्हे तर सोसत होते. आपलं अस्तित्व गमावत चालले होते. आपली घरं, पिढीजात भूमी सोडून ते का जातील? अपराध काय? पण कुणी दखल घेतली नाही, आजही घेतली जात नाही.

  • 7/9

    ‘आमचे पिढय़ानुपिढय़ांचे शेजारी जन्माचे वैरी झाले. आम्ही सोसत राहिलो, परागंदा व्हायला लागू नये म्हणून! पण पाहता पाहता काश्मीरचे खुले, मोकळे वातावरण विषाक्त झाले, अशी काहीशी अवस्था काश्मिरी पंडितांची झाली होती.

  • 8/9

    अंगावरील कपडय़ांनिशी कडाक्याच्या थंडीत लोक स्वत:चा, बायको, मुलांचा जीव वाचवत, आपल्या वाडवडलांच्या वास्तूकडे शेवटची नजर टाकत जम्मू आणि इतरत्र गेले. ते आजही तेथेच राहत आहेत. कुणाही राजकीय पक्षाला त्याबद्दल काही करायचे नाहीय का? अनेक वष्रे ते तंबूत राहत होते. आता स्वकष्टाने त्यांची घरं उभी आहेत.

  • 9/9

    राहुल पंडिता, शशी शेखर, डॉ. शक्ती भान, तोषखानी, सुशील पंडित, नीस कौल आणि अनेक काश्मिरींनी आपल्या पायाखालची जमीन गेल्याचं दु:ख वर्णन केलं. याच घटनेवर आता शिकारा हा सिनेमा येऊ घातला आहे.

Web Title: When kashmiri pandits kicked out from kashmir bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.