-
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. मतदानापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत 'आप' पुन्हा सत्तेत येणार असल्याचं चित्र आहे. टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या मतदानपूर्व चाचणीमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला पसंती दिल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
-
५२ टक्के दिल्लीच्या मतदारांनी 'आप'ला समर्थन दर्शवलं. तर ३४ टक्के जनतेने भाजपाला समर्थन दिलं आहे.
-
सध्याची परिस्थिती पाहिल्यास भाजपाच्या मतांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून व्यक्त केली आहे.
-
२०१५ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा 'आप'ला कमी मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
-
२०१५ साली 'आप'ला ५५ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा ५२ टक्के इतका असेल असा अंदाज आहे.
-
२०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा 'आप'ला अडीच ते तीन टक्के कमी मते मिळतील, तर दुसरीकडे भाजपाला २०१५ च्या तुलनेत यंदा १.७ टक्के अधिक मते मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
-
'आप'ला विधानसभेच्या ७० पैकी ५४ ते ६० जागा मिळतील व भाजपाला १०-१४ जागांवर समाधान मानावे लागेल, असे या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
-
भाजपाला तीन जागांचा फायदा होणार आहे. तर २०१५ साली ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळणाऱ्या 'आप'चे संख्याबळ कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-
काँग्रेसला दिल्लीत केवळ एक ते दोन जागांवर विजय मिळू शकतो, असंही या मतदानपूर्व चाचणीच्या आकडेवारीमधून दिसते.
-
भाजपा, आप आणि काँग्रेस हे तीन पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, 'आप'विरुद्ध भाजपा अशी दुहेरी लढत बघायला मिळेल असंही या पाहणीत दिसून आलं आहे. त्यामुळे मतदानपूर्व चाचणी अंदाज किती खरे ठरतात, हे 11 फेब्रुवारीलाच बघायला मिळाणार आहे.
Opinion Poll : दिल्लीत ‘आप’; भाजपा धोक्यात
8 फेब्रवारीला होणार मतदान
Web Title: Delhi election opinion poll aap will win in delhi assembly election prediction of opinion poll bmh