Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. jamia firing is it name of that boy in voter list bmh

मतदार यादीत नाव, मग अल्पवयीन कसा; सत्य काय?

जाणून घ्या खरं काय खोटं काय?

February 6, 2020 16:32 IST
Follow Us
  • ३० जानेवारी रोजी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर गोळीबार करणाऱ्या शस्त्रधारी अल्पवयीन युवकाचं नाव २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत असल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.
    1/10

    ३० जानेवारी रोजी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर गोळीबार करणाऱ्या शस्त्रधारी अल्पवयीन युवकाचं नाव २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत असल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.

  • 2/10

    गोळीबाराच्या घटनेतील युवक हा अल्पवयीन असेल तर मग त्याचे नाव मतदार यादीत कसे, असा सवालही या मजकुरात करण्यात आला आहे. मात्र सत्यस्थिती अशी आहे की, भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिसत असलेल्या मतदाराचे नाव आणि इतर माहिती गोळीबार करणाऱ्या युवकाशी संबंधित नाही.

  • 3/10

    गोळीबार करणारा युवक आणि मतदार या दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. प्रसारित झालेल्या मेसेजमध्ये मतदाराचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मतदाराच्या वडिलांचे नाव दीपचंद शर्मा असं दाखविण्यात आलं आहे.

  • 4/10

    पंरतु गोळीबार करणाऱ्या युवकाच्या वडिलांचं नाव दीपचंद शर्मा नाही. गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील जेवर मतदारसंघात काही पत्रकारांनी मतदारांच्या नावाची छाननी केली.

  • 5/10

    यात गोळीबार करणाऱ्या युवकाशी माहिती जुळली नाही. जेवर मतदारसंघातील इतर 16 मतदारांची नावे ही गोळीबार करणाऱ्या युवकाशी मिळती जुळती आहेत.

  • 6/10

    मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी वय 18 वर्षे असणं आवश्यक आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गोळीबार करणारा युवक अल्पवयीन आहे.

  • 7/10

    त्यामुळे त्याला कायद्यानं मतदानाचा अधिकार मिळू शकणार नाही हे स्पष्ट आहे. तरीही खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • 8/10

    मध्यतंरी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांविषयी खोटी माहिती प्रसारित करण्यात आली होती. राजकीय अभिनिवेश आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा खोट्या माहितीचा मोठ्या प्रमाणावर वापर समाज माध्यमांवर केला जात आहे.

  • 9/10

    यातील काही लोकांनी समाज माध्यमांवर एखाद्याच्या धर्मावरून टीका केली आहे. काहींनी एखाद्याच्या जातीवरून अनुदार उदगार काढले आहेत. (ANI)

  • 10/10

    फेसबुकवर याबाबतीत काहींनी शिवीगाळही केली आहे. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकार आणि पोलिसांकडून वारंवार केलं जात आहे.

Web Title: Jamia firing is it name of that boy in voter list bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.