-
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदारपदी असणारे उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे. उदयनराजे भोसलेंचा महाराष्ट्रात एक वेगळा चाहतावर्ग आहे. उदयनराजेंची बिनाधास्त स्टाइल आणि बेधडक स्वभाव अनेकांना आवडतो. त्यात उदयनराजे भाषणाला उभे राहिले की मग त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज सुरु होतो. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाददेखील निर्माण झाला आहे. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे असेच काही डायलॉग्ज आणि वक्तव्यं पाहूयात… (संग्रहित फोटो – फेसबुक/एक्स्प्रेस)
-
'पक्षबिक्ष गेला खड्ड्यात, साताऱ्याची जनता हाच माझा पक्ष. उदयनराजे स्वतंत्र आहेत. मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नव्हतो'
-
"एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता, स्टाईल इज स्टाईल"
-
"खूप प्रेम करतो तुमच्या सातारकरांवर माना अगर न माना. फरक पडणार नाही…तेव्हा आणि आजसुद्धा… स्टाईल इज स्टाईल"
-
"माझे अनेक मित्र भाजपात आहेत. भाजपाचे आमदार आणि खासदार मूग गिळून का गप्प आहेत? मी म्हटलं घाबरतं कशाला ? तर म्हणाले मोदी आहेत,,,आमच्याकडे साताऱ्यात एक मोदी आहे कंदी पेढेवाला…हा मोदी एवढा मोठा कोण लागून गेला?"
-
"चुकीला माफी नाही आणि उदयनराजेकडून तर अजिबात नाही…कोणीही आणि कोणताही पक्ष असू द्या..कोणीही कितीही मोठा असला तरी चुकीला माफी नाही"
-
"अजून काय केस होणार आणि काय…लोकांसाठी केसेस छाताडावर झेलण्याची माझी तयारी आहे"
-
"यांना काय जमतं? धऱणात पाणी नाय साठलं की तिथं मुतायचं. नाही तर या रामराजेंनी सांगायचं की मी सर्व नीरा देवघर कोळून प्यायलोय"
-
"आमच्या मुसक्या बांधण्याची मजल आज नाय उद्या नाय आणि भविष्यकाळात कुणाची नसणार…कॅमेऱ्यात सांगतोय…परत सांगितलं नाय म्हणून सांगायचं नाय" (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
"मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही" (एक्स्प्रेस फोटो – आशिष काळे)
-
"माझा फक्त पंचतत्त्वांवर विश्वास आहे. पण कर्मकांडे मला पटत नाहीत. राजघराण्यातील परंपरा-रूढी पटो न पटो त्या पाळल्याच पाहिजेत".
-
"एक युगपुरुष कधीतरी जन्माला येतो ते म्हणजे शिवाजी महाराज, जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. इतर कुणालाही जाणता राजा उपाधी देणं याचाही मी निषेध करतो"
-
"माझ्याविरोधात ब्र शब्द काढला तर ध्यानात ठेवा मी बांगड्या घातलेल्या नाहीत आणि घालणार नाही. कोणी काहीही बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं असं कोणी सांगितलं"
Birthday Special: “पक्षबिक्ष गेला खड्ड्यात…”; डॅशिंग उदयनराजेंचे गाजलेले डायलॉग्ज
उदयनराजेंच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज सुरु होतो
Web Title: Birthday special udayanraje bhosale famous dialogues sgy