• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. photos of explosive car mukesh ambani mumbai police and alert know exactly what happened asy

स्फोटकं असणारी गाडी, अंबानी, मुंबई पोलीस आणि अलर्ट… जाणून घ्या नक्की काय घडलं

मुंबई पोलीस इन अ‍ॅक्शन! अंबानीवरही सोडली छाप; इम्प्रेस झालेले अंबानी म्हणाले…

Updated: September 9, 2021 00:34 IST
Follow Us
    • उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असणारी गाडी आढळल्याने गुरुवारी रात्री मुंबईमध्ये एकच खळबळ उडली. कंबाला हिल परिसरातील अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. “आम्हाला विश्वास आहे की…”; अंबानी कुटुंबियांनी मानले मुंबई पोलिसांचे आभार (फोटो सौजन्य: एएनआय आणि रॉयटर्स)
    • 1/10

      ही गाडी अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळच उभी करण्यात आली होती. गाडीमध्ये जिलेटिन स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    • 2/10

      अंबानींच्या घराजवळ स्फोटके सापडल्याने मुंबईत अलर्ट जारी करण्यात आल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली.

    • 3/10

      “मुंबई पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने निर्णय घेत केलेल्या कारवाईबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच वेगाने त्यांचा तपास पूर्ण करतील,” असं रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

    • 4/10

      अन्य दोन पथकांनी या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी सुरु केली आहे.

    • 5/10

      गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांची १० पथकं तयार करण्यात आली आहेत.

    • 6/10

      एक पथक परिसरातील सर्व सीसीटीव्हींच्या आधारे तपास करत आहे. तर दुसरे पथक वाहतूक मुख्यालयातील कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे. अन्य एक पथक क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही तपासणार आहे.

    • 7/10

      चौथ्या पथकाला आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती मिळवण्याचं काम देण्यात आलं आहे. तर एक तुकडी संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे. अन्य एक पथक इंडियन मुजाहिद्दीनचा या प्रकरणाशी काही संबंध असू शकतो का यासंदर्भातील शक्यता पडताळून पाहत आहे.

    • 8/10

      इंडियन मुजाहिद्दीनच्या एका हस्तकाने २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारं एक पत्र पाठवलं होतं. या पत्रामध्ये अंबानी कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देण्यात आळी होती. याचा सध्याच्या प्रकरणाशी काही संबंध आहे का यासंदर्भातील पोलीस तपास करत आहेत.

    • 9/10

      दुसरीकडे या प्रकरणाचा तपासदेखील सुरु करण्यात आला आहे. दरम्यान काल पासून घडत असलेल्या घडामोडींच्या आणि खुलाशांच्या पार्श्वभूमीवर अंबानी कुटुंबियांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

Web Title: Photos of explosive car mukesh ambani mumbai police and alert know exactly what happened asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.