• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. know the uses of turbo air ventilator how does it works nrp

कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरणारी घुमटवजा वस्तू काय काम करते? ती कशासाठी लावतात?

August 13, 2021 15:56 IST
Follow Us
  • आपण अनेकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला काही कारखाने पाहतो. या कारखान्यांच्या छतांवर स्टेनलेस स्टीलची घुमटवजा वस्तू फिरताना दिसते.
    1/11

    आपण अनेकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला काही कारखाने पाहतो. या कारखान्यांच्या छतांवर स्टेनलेस स्टीलची घुमटवजा वस्तू फिरताना दिसते.

  • 2/11

    सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चमकदार दिसणारे हे घुमट फिरताना फार चांगले दिसतात. पण हे घुमट छतावर लावण्यामागे अनेक महत्त्वाची कारणं असतात.

  • 3/11

    अनेक कारखान्यांच्या छतावर बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे छोट्या घुमटाप्रमाणे दिसणाऱ्या या गोष्टीला टर्बो व्हेंटिलेटर (Turbo Ventilator) असे म्हणतात.

  • 4/11

    काही ठिकाणी याला एअर व्हेंटिलेटर (Air Ventilator), टर्बाइन व्हेंटिलेटर (Turbine Ventilator), रुफ एक्सट्रॅक्टर (Roof Extractor)अशा विविध नावानेही ओळखले जाते.

  • 5/11

    काही ठिकाणी टर्बो व्हेंटिलेटर कारखाने आणि मोठ्या दुकानांच्या छतावर लावले जातात. तर काही भागात रेल्वे स्थानकांच्या छतावरही हे व्हेंटिलेटर पाहायला मिळतात.

  • 6/11

    टर्बो व्हेंटिलेटरचे पंखे हे मध्यम गतीने चालतात.

  • 7/11

    टर्बो व्हेंटिलेटरचे मुख्य काम हे कारखान्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील गरम हवा बाहेर फेकणे हे असते.

  • 8/11

    टर्बो व्हेंटिलेटरद्वारे कारखान्यातील गरम हवा बाहेर फेकली जाते. तर त्याचवेळी खिडकी किंवा दरवाज्यामधून नैसर्गिक वारा कारखान्यात खेळता राहतो.

  • 9/11

    टर्बो व्हेंटिलेटर हे बराच काळ टिकतात. यामुळे कारखान्यात काम करणाऱ्यांना उकाड्याचा त्रास होत नाही.

  • 10/11

    विशेष म्हणजे टर्बो व्हेंटिलेटर गरम हवा बाहेर फेकण्यासोबतच कारखान्यातील दुर्गंध बाहेर टाकण्याचे काम करतो.

  • 11/11

    इतकंच नव्हे तर हवामान बदलानंतर ते आतील आर्द्रताही बाहेर फेकते.

Web Title: Know the uses of turbo air ventilator how does it works nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.