• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. from landing fighter jets 18 flyover know about purvanchal expressway abn

लढाऊ विमानांचं लँडिंग ते १८ फ्लायओव्हर; जाणून घ्या २२ हजार ५०० कोटींच्या पूर्वांचल एक्सप्रेसवेबद्दल

एक्स्प्रेस वेसाठी सुलतानपूर जिल्ह्यातील कुडेभर येथे तीन किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.

November 16, 2021 18:07 IST
Follow Us
  • पंतप्रधान मोदींनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या ३४१ किमी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन केले आहे. (फोटो सौजन्य -नरेंद्र मोदी ट्विटर)
    1/17

    पंतप्रधान मोदींनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या ३४१ किमी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन केले आहे. (फोटो सौजन्य -नरेंद्र मोदी ट्विटर)

  • 2/17

    हा एक्स्प्रेस वे राज्याचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडणार आहे. यामुळे लखनऊ ते गाझीपूर हा प्रवास अवघ्या साडेचार तासात पूर्ण करता येणार आहे. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 3/17

    लखनऊमधील चांद सराय येथून सुरू होऊन गाझीपूरपर्यंत पोहोचणाऱ्या या एक्स्प्रेस वेच्या उभारणीसाठी २२ हजार ४९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 4/17

    हा एक्स्प्रेस वे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर या नऊ जिल्ह्यांतून जाणार आहे. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 5/17

    सध्या द्रुतगती मार्ग सहा लेनचा आहे, तो नंतर आठ लेनपर्यंत वाढवता येईल. सध्या हा एक्स्प्रेस वे टोल टॅक्सपासून मुक्त ठेवण्यात आला आहे.

  • 6/17

    पंतप्रधान मोदी पूर्वांचल एक्स्प्रेसवेचे उद्घाटन करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हर्क्यूलस विमानाने उत्तर प्रदेशात दाखल झाले. (फोटो सौजन्य – ANI)

  • 7/17

    उद्घाटनादरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा अनेक एअर शो आयोजित करण्यात आला होता.

  • 8/17

    एअर शोमध्ये सुखोई, मिराज, राफेल, एएन ३२ सारखी विमाने सहभागी झाली होती.

  • 9/17

    जुलै २०१८ मध्ये आझमगडमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. (फोटो सौजन्य- ट्विटर)

  • 10/17

    पूर्वांचल द्रुतगती मार्ग सुमारे २२,५०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. (फोटो सौजन्य- ट्विटर)

  • 11/17

    सहा लेनचा एक्स्प्रेस वे आठ लेनपर्यंत वाढवता येणार आहे. एकदा तो लोकांसाठी खुला झाल्यानंतर, लखनऊ ते गाझीपूर प्रवासाची वेळ ६ तासांवरून ३.५ तासांपर्यंत कमी होईल. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 12/17

    मात्र द्रुतगती मार्गाचे उद्घाटन होत असताना, त्यात अद्याप पेट्रोल पंप किंवा लांबच्या प्रवासात आवश्यक असलेल्या अन्य सुविधा नाहीत.

  • 13/17

    जे लोक या रस्त्याने प्रवास करणार आहेत त्यांच्या वाहनांमध्ये काही अन्न आणि पाण्यासह इंधनाची संपूर्ण टाकी भरलेली असणे आवश्यक आहे कारण तेथे कोणतेही रेस्टॉरंट देखील नाहीत. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 14/17

    द्रुतगती मार्गावर प्रत्येक १०० किलोमीटरवर दोन विश्रांती थांबे बांधण्यात येत आहेत. ते पूर्ण झाल्यावर या भागात रेस्टॉरंट्स, शौचालय सुविधा, पेट्रोल पंप, मोटार गॅरेज आणि इतर मूलभूत सुविधा असतील.

  • 15/17

    एक्स्प्रेस वेसाठी सुलतानपूर जिल्ह्यातील कुडेभर येथे तीन किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे. ही धावपट्टी आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी आहे

  • 16/17

    द्रुतगती महामार्गावर १८ उड्डाणपूल, सात रेल्वे ओव्हर ब्रिज, सात लांब पूल, १०४ छोटे पूल, १३ इंटरचेंज आणि महामार्गावर २७१ अंडरपास आहेत. (नरेंद्र मोदी/ ट्विटर)

  • 17/17

    उत्तर प्रदेशातील पूर्व भाग, विशेषत: लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर या जिल्ह्यांना नवीन एक्स्प्रेस वेचा आर्थिक लाभ मिळणार आहे कारण यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. (ट्विटर)

Web Title: From landing fighter jets 18 flyover know about purvanchal expressway abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.