• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. sip returns tips know how to get better returns from mutual fund sip investments marathi news rak

म्युच्युअल फंड SIPमधून चांगला परतावा हवाय? ‘या’ ८ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

आपण अशा ८ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यामातून तुम्हाला एसआयपीमधून मिळणारा लाभ वाढण्यास मदत होईल

July 15, 2025 14:32 IST
Follow Us
  • म्युच्युअल फंडमधील एसआयपी हा दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे, पण फक्त गुंतवणूक सुरू करणे पुरेसे नाही. कारण कधी कधी लहान चुका देखील तुमच्या कमाईवर खूप परिणाम करू शकतात. आज आपण अशा ८ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यामातून तुम्हाला एसआयपीमधून मिळणारा लाभ वाढण्यास मदत होईल. (फोटो - freepik)
    1/10

    म्युच्युअल फंडमधील एसआयपी हा दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे, पण फक्त गुंतवणूक सुरू करणे पुरेसे नाही. कारण कधी कधी लहान चुका देखील तुमच्या कमाईवर खूप परिणाम करू शकतात. आज आपण अशा ८ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यामातून तुम्हाला एसआयपीमधून मिळणारा लाभ वाढण्यास मदत होईल. (फोटो – freepik)

  • 2/10

    वेगवेगल्या फंडमध्ये एसआयपी करा

    संपूर्ण एसआयपी एकाच फंडमध्ये गुंतवू नका. मल्टी कॅटेगरी किंवा वेगवेगळ्या सेक्टरच्या फंड्समध्ये गुंतवणूक करा. (फोटो – freepik)

  • 3/10

    दीर्घकाळ गुंतवणूक करत राहा

    एसआयपीचा खरा लाभ हा कंपाउंडिंगमधून मिळतो, जे वेळ वाढत गेली की वाढतो. कमीत कमी ५ ते १० वर्ष गुंतवणूक कायम ठेवा. दीर्घकाळ गुंतवणूक करत राहा. (फोटो – freepik)

  • 4/10

    मार्केट कोसळल्यानंतर घाबरून जाऊ नका

    जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा एसआयपी थांबवण्याऐवजी ती तशीच सुरू ठेवा. घसरणीच्या काळात खरेदी केलेले युनिट्स दीर्घकाळात जास्त रिटर्न देतात. (फोटो – freepik)

  • 5/10

    दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवा

    जसे तुमचे उत्पन्न वाढेल, तसे एसआयपीची अमाउंट देखील वाढवा. याला एसआयपी टॉप-अप असे म्हणतात, यामुळे वेगाने वेल्थ तयार होते. (फोटो – freepik)

  • 6/10

    दरवर्षी फंडच्या परफॉर्मन्सचा आढावा घ्या

    तुमच्या फंडचा परफॉर्मन्स दरवर्षी तपासा. जर सलग दोन वर्षे खराब परतावा मिळत असेल, तर फंड बदलण्याचा विचार करा. (फोटो – freepik)

  • 7/10

    योग्य कॅटेगरी फंड निवडा

    तुमचे ध्येय आणि रिस्क प्रोफाइलवर आधारित फंड निवडा. उदाहरणार्थ, इक्विटी फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले असतात. (फोटो – freepik)

  • 8/10

    एसआयपी तुमच्या ध्येयाशी कनेक्ट करा

    प्रत्येक एसआयपी रिटायरमेंट, मुलांचे शिक्षण किंवा घर खरेदी यासारख्या विशिष्ट आर्थिक उद्दिष्टांशी जोडले पाहिजे. (फोटो – freepik)

  • 9/10

    भावनेवर आधारित निर्णय टाळा
    बाजारासंबंधी बातम्या किंवा भावनांवर अवलंबून एसआयपी बंद करणे किंवा फंड बदलणे चुकीचे असू शकते. शिस्त आणि लॉन्ग टर्म विचार करणे महत्वाचे आहे. (फोटो – freepik)

  • 10/10

    या गोष्टींची काळजी घेत राहिल्यास तुमची गुंवणूक दिवसेंदिवस वाढत राहिल आणि तुम्हाला चांगला परतावा मिळेल. (फोटो – freepik)

TOPICS
गुंतवणूकInvestmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sip returns tips know how to get better returns from mutual fund sip investments marathi news rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.