• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. who is akshara singh potential bjp candidate bihar elections 2025 bhojpuri actress in politics aam

सर्वात महागडी भोजपुरी अभिनेत्री भाजपाच्या तिकिटावर विधानसभा लढवणार? कोण आहे अक्षरा सिंह?

Who Is Bhojpuri actress Akshara Singh: अक्षरा सिंह भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

Updated: October 9, 2025 17:11 IST
Follow Us
  • Bhojpuri actress Akshara Singh Likely BJP candidate in Bihar elections 2025
    1/9

    गायिका मैथिली ठाकूरनंतर, भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह आता बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे.

  • 2/9

    अभिनेत्री अक्षरा सिंह आणि केंद्रीय मंत्री व बेगुसरायचे भाजपा खासदार गिरीराज सिंह यांच्यातील अलिकडच्या भेटीमुळे ती भाजपाच्या तिकिटावर बिहार विधानसभा लढवणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

  • 3/9

    अक्षराने तिच्या एक्स हँडलवर या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेटल्याचे म्हटले आहे. त्यांच्या संभाषणाचा तपशील अद्याप अज्ञात असला तरी, बिहारच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर लगेचच ही भेट झाली होती.

  • 4/9

    अक्षरा सिंह भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ती अ‍ॅक्शन ड्रामा तबदला, राजकीय चित्रपट सरकार राज आणि अ‍ॅक्शन रोमान्स चित्रपट सत्या यासारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते.

  • 5/9

    अक्षरा आणि गिरिराज सिंह यांच्या भेटीमुळे सोशल मीडियावर ती २०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या अफवांनी धुमाकूळ घातला आहे. काही युजर्सनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिने पवन सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.

  • 6/9

    बिहारच्या निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी अक्षरा सिंहने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतल्याने ती निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

  • 7/9

    दरम्यान अक्षरा सिंह निवडणूक लढवणार आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • 8/9

    २०२३ मध्ये, अक्षरा सिंह तिच्या वडिलांसोबत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षाच्या व्यासपीठावर दिसली होती, ज्यामुळे तिने राजकारणात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण, अखेर त्या अफवाच ठरल्या होत्या.

  • 9/9

    बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून भोजपुरी अभिनेते चर्चेत आले आहेत. भोजपुरी सुपरस्टार पवण सिंह यांनीही केंद्रीय मंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या भेट घेतली आहे.

TOPICS
बिहार निवडणूक २०२५Bihar Election 2025भारतीय जनता पार्टी बीजेपीBharatiya Janata Party Bjp

Web Title: Who is akshara singh potential bjp candidate bihar elections 2025 bhojpuri actress in politics aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.