• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india vs south africa hosts run out of steam in rajkot

लोटांगण….

October 19, 2015 12:40 IST
Follow Us
    • भारत आणि दक्षिण आफ्रिका पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली होती. मात्र, राजकोट येथे रविवारी झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव करून २-१ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे डेव्हिड मिलरला ओपनिंग करण्याची संधी मिळाली.
    • 1/

      दक्षिण आफ्रिकेचा पहिला बळी हरभजन सिंगने घेतला. त्याने डेव्हिड मिलरला केवळ ३३ धावांवर तंबूत पाठवले.

    • अमित मिश्राने हाशिम आमलाला केवळ पाच धावांवर रोखले. त्यानंतर सामन्याची सूत्रे फॅफ डू प्लेसिसने आपल्या हातात घेतली आणि भारतीय गोलंदाजांचा सामना केला.
    • दरम्यान, क्विंटन डीकॉकने १०३ धावांची महत्वपूर्ण शतकी खेळी करत आफ्रिकेला सन्मान जनक धावसंख्येवर पोहचविले.
    • संघाचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स आणि जीन-पॉल डय़ुमिनी केवळ अनुक्रमे ४ व १४ धावांवर बाद झाले.
    • फरहान बेहरादिनच्या ३६ चेंडूत ३३ धावांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने २७० धावांवर मजल मारली.
    • द.आफ्रिकेने दिलेले २७१ धावांचे आव्हान पेलताना भारताने चांगली सुरुवात केली. शिखर धवन लवकर बाद झाल्यावर रोहित शर्माने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि फलंदाजी सुरु ठेवली.
    • 2/

      विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी ७२ धावांची भागीदारी उभारली.

    • 3/

      विराट कोहलीने तब्बल ८ महिन्यांनंतर अर्धशतक साजरे केले.

    • 4/

      पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा रोहित शर्मा यावेळी ६५ धावांवर बाद झाला

    • 5/

      रोहित शर्मा बाद झाल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने विराटच्या मदतीने फटकेबाजी सुरु ठेवली.

    • 6/

      ४१व्या षटकात धोनी माघारी परतला आणि मग विजयाचा मार्ग अधिक बिकट झाला. त्यानंतर ४८ चेंडूंत भारताला ७८ धावांची आवश्यकता होती.

    • 7/

      ४८ चेंडूंत भारताला ७८ धावांची आवश्यकता होती. कोहलीने काही चौकार मारून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इम्रान ताहीरने सुरेश रैनाला भोपळाही फोडू न दिल्यामुळे ४४व्या षटकात भारताची ४ बाद २०६ अशी अवस्था झाली. आणि शेवटी सामना भारताच्या हातून निसटला.   

Web Title: India vs south africa hosts run out of steam in rajkot

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.