-
Eng vs Ind Test : भारताला सामन्यात हार पत्करावी लागली. पण कर्णधार विराट कोहलीने दोनही डावात झुंजार खेळी केली. त्याने पहिल्या डावात १४९ तर दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या.
-
Eng vs Ind Test : सॅम कुरान या नवोदित खेळाडूने अष्टपैलू खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि सामनावीर ठरण्याचा मान मिळवला. त्याने दुसऱ्या डावात उपयुक्त अर्धशतक ठोकले. तर भारताच्या पहिल्या डावात महत्वाचे चार गडी बाद केले.
-
Eng vs Ind Test : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने दुसऱ्या डावात ४ बळी टिपले. यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश होता. सामन्यातील शेवटचा गडीदेखील स्टोक्सनेच बाद केला.
-
Eng vs Ind Test : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने आपल्या गोलंदाजीची चमक दुसऱ्या डावात दाखवून दिली. त्याने दुसऱ्या डावात तब्बल ५ बळी टिपले.
-
Eng vs Ind Test : फिरकीपटू अश्विनने अनुभवाला साजेशी गोलंदाजी केली. दोनही डावात त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक याला सारख्याच पद्धतीने त्रिफळाचित केले. आतापर्यंत अश्विनने कुकला सर्वाधिक ९ वेळा बाद केले आहे.
Ind vs Eng : पहिल्या कसोटी सामन्यातील रंजक घडामोडी
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर सामन्याच्या चौथ्या दिवशी ३१ धावांनी विजय मिळवला.
Web Title: Ind vs eng england beat india by 31 runs 5 interesting facts