• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs sa india vs south africa rohit sharma century breaks list of records vjb

IND vs SA : भारताच्या ‘हिटमॅन’ने लगावला विक्रमांचा षटकार, पहा फोटो गॅलरी

रोहितचे दमदार शतक

October 19, 2019 17:06 IST
Follow Us
  • २-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसावरही वर्चस्व राखले. नाणेफेक जिंकून पहिल्याच दिवशी भारताने द्विशतकी मजल मारली. रोहित शर्माने धमाकेदार शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
    1/7

    २-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसावरही वर्चस्व राखले. नाणेफेक जिंकून पहिल्याच दिवशी भारताने द्विशतकी मजल मारली. रोहित शर्माने धमाकेदार शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

  • 2/7

    रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार (१७*) खेचण्याचा विक्रम केला. त्याने बेन स्टोक्सचा १३ षटकांचा विक्रम मोडला.

  • 3/7

    रोहितने कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी कर्णधार अझरुद्दीन याच्याशी बरोबरी केली.

  • 4/7

    रोहित शर्मा एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या आधी माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी अशी कामगिरी केली होती.

  • 5/7

    एका वर्षाच्या कालावधीत ९ शतके ठोकणारा रोहित चौथा सलामीवीर ठरला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

  • 6/7

    एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितने रचला. त्याने १७ षटकार खेचले. या आधी विंडिजच्या शिमरॉन हेटमायरने कसोटी मालिकेत १५ षटकार लगावले होते. तो विक्रम रोहितने मोडला.

  • 7/7

    कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने गौतम गंभीरशी बरोबरी केली. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.

Web Title: Ind vs sa india vs south africa rohit sharma century breaks list of records vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.