• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs nz know the 5 big reasons of team india in auckland odi nck

ही आहेत भारतीय संघाच्या पराभवाची कारणे…

एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने गमावली…

February 8, 2020 17:51 IST
Follow Us
  • टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २२ धावांनी मात करत वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २७४ धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करत चांगली झुंज दिली...पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले..जाणून घेऊयात भारताच्या पराभवाची कारणे...
    1/6

    टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २२ धावांनी मात करत वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २७४ धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करत चांगली झुंज दिली…पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले..जाणून घेऊयात भारताच्या पराभवाची कारणे…

  • दबावाचा फायदा फठवण्यात अपयशी – दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडवरील दबावाचा फायदा उठवता आला नाही. न्यूझीलंडच्या १९६ धावांवर आठ विकेट गेल्या असतानाही यजमानांनी २७४ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवलं.
  • जसप्रीत बुमराहचं अपयश – भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या लौकीकास साजेशी गोलंदाजी करू शकला नाही. न्यूझीलंडविरोधतच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात बुमराहला एकही बळी घेता आला नाही. तसेच डेथ ओव्हरमध्ये बुमराहाला आपली छाप सोडता आली नाही. दुसऱ्या सामन्यात पहिल्या सहा षटकात बुमराहनं ३७ धावा दिल्या होत्या. सामना संपल्यानंतर बुमराहने दहा षटकांत ६४ धावा खर्च केल्या होत्या.
  • फलंदाजांचा प्लॉप शो – भारताच्या आघाडीच्या फलंदाजांसह मधल्या फळीतील फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी नांगी टाकली. पृथ्वी-मंयाक झटपाट बाद झाल्यानंतर विराट कोहली, जाधव आणि राहुलही लगेच बाद झाले. त्यामुळे इतर फलंदाजांवर दडपण आले. भारताकडून जाडेजा आणि श्रेअस अय्यर यांनी थोडीफार चमक दाखवली.
  • संयमाचा अभाव – लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी आणखी समजदारीनं फलंदाजी करायला हवी हाती. आघाडीची फळी कोसळल्यानंतर मैदानावर छोट्या-छोट्या भागिदारी करून विजयाकडे वाटचाल करण्याचा इरादा एकाही फंलदाजाकडे दिसला नाही. जाडेजा, शार्दुल, चहल आणि सैनी यांनी आणखी थोडा संयम दाखवला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
  • डेथ ओव्हरमध्ये निष्प्रभ गोलंदाजी – पुन्हा एकदा डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरले आहेत. अखेरच्या षकटांत गोलंदाजांना न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. ४१ षटकांपर्यंत भारत-न्यूझीलंड संघाची धावसंख्या सारखीच होती. मात्र, अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी जास्त धावा खर्च केल्या तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बळी घेतले.

Web Title: Ind vs nz know the 5 big reasons of team india in auckland odi nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.