• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. hardik pandya blistering 158 runs in 55 balls with 20 sixes mumbai indians hitter super batting vjb

पांड्याचा धुमधडाका..! २० षटकारांसह ठोकल्या ५५ चेंडूत १५८*

पांड्याने गोलंदाजांना धुतलं…

March 6, 2020 17:30 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा तडाखेबाज अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या हा त्याच्या फटकेबाजीमुळे कायम मैदान गाजवतो. (सर्व फोटो - हार्दिक पांड्या ट्विटर)
    1/18

    भारतीय संघाचा तडाखेबाज अष्टपैलू फलंदाज हार्दिक पांड्या हा त्याच्या फटकेबाजीमुळे कायम मैदान गाजवतो. (सर्व फोटो – हार्दिक पांड्या ट्विटर)

  • 2/18

    नुकतीच त्याने ३७ चेंडूत शतकी खेळी केल्याने तो चर्चेत आला होता.

  • 3/18

    या चर्चा थांबण्याआधी हार्दिकने एक नवा पराक्रम केला.

  • 4/18

    हार्दिक पांड्याने डॉ. डी वाय पाटील टी २० स्पर्धेत खेळताना तुफानी खेळी केली.

  • 5/18

    सध्या तो डॉ डी वाय पाटील टी २० स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळत आहे.

  • 6/18

    या संघाकडून खेळताना त्याने ५५ चेंडूत नाबाद १५८ धावांची खेळी केली.

  • 7/18

    दुखापतीमुळे गेले कित्येक महिने हार्दिक पांड्या क्रिकेटपासून दूर होता, पण क्रिकेटच्या मैदानात त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून 'कमबॅक' केले.

  • 8/18

    हार्दिक पांड्याने कमबॅक केल्यापासून तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

  • 9/18

    डॉ डी वाय पाटील टी २० स्पर्धेत शुक्रवारी रिलायन्स वन विरूद्ध बीपीसीएल असा सामना रंगला.

  • 10/18

    या सामन्यात हार्दिक पांड्याने नाबाद दीडशतकी खेळी केली. या खेळीत हार्दिकने २० उत्तुंग षटकार खेचले.

  • 11/18

    त्याच्या दमदार खेळीच्या बळावर रिलायन्स वनने ४ बाद २३८ धावा केल्या.

  • 12/18

    या आव्हानाचा पाठलाग करताना बीपीसीएल संघाचा डाव १३४ धावांत आटोपला आणि रिलायन्स वनने सामना १०४ धावांनी जिंकला.

  • 13/18

    हार्दिकने या स्पर्धेत ४ सामन्यात ३८ षटकारांसह ३४७ धावा केल्या आहेत.

  • 14/18

    हार्दिक पांड्याने डॉ. डी व्हाय पाटील टी २० स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ४ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.

  • 15/18

    यानंतर दुसर्‍या सामन्यात पांड्याने १० षटकारांच्या मदतीने १०५ धावा फटकावल्या. या सामन्यात त्याने ३७ चेंडूत शतक पूर्ण केले होते.

  • 16/18

    तिसर्‍या सामन्यातही पांड्याने दमदार कामगिरी केली. त्याने पुन्हा ४ षटकारांसह ४६ धावा केल्या.

  • 17/18

    चौथ्या सामन्यात त्याने २० षटकारांच्या मदतीने १५८ धावा केल्या. त्यानुसार पांड्याने चार सामन्यात ३८ षटकारांच्या मदतीने ३४७ धावा केल्या आहेत.

  • 18/18

    IPL 2020 च्या तोंडावर त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Web Title: Hardik pandya blistering 158 runs in 55 balls with 20 sixes mumbai indians hitter super batting vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.