-
वन-डे, टी-२० क्रिकेटच्या जमान्यातही आज कसोटी क्रिकेट आपलं स्थान कायम राखून आहे. पाच दिवसांना सामना खेळताना खेळाडूच्या शाररिक आणि मानसिक क्षमतेचाही कस लागतो.
-
कसोटी सामन्यांना प्रेक्षकांची संख्या रोडावत असली तरीही प्रत्येक खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत एकदातरी कसोटी क्रिकेट खेळायचं असतं.
-
कसोटी सामन्यात झळकावलेलं शतक हे प्रत्येक फलंदाजासाठी खास असतं.
-
आज आपण कसोटी कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट शतकाने करणाऱ्या फलंदाजांविषयी माहिती करुन घेणार आहोत.
-
१) ग्रेग चॅपल – १९७० साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या चॅपल यांनी पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं होतं. पर्थच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात चॅपल यांनी १०८ धावांची खेळी केली. १४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर चॅपल यांनी आपला अखेरचा कसोटी सामना १९८४ साली पाकिस्तानविरुद्ध सिडनी येथे खेळला. या सामन्यात चॅपल यांनी १८२ धावांची खेळी केली होती.
-
२) मोहम्मद अझरुद्दीन – १९८४ साली ईडन गार्डन्स मैदानावर अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळताना अझरुद्दीनने ११० धावांची खेळी केली होती. २००० साली अझरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. कारकिर्दीतल्या या अखेरच्या कसोटी सामन्यातही अझरुद्दीनने १०२ धावा केल्या होत्या.
-
३) अॅलिस्टर कूक – २००६ साली भारताविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यात कूकने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ज्यात त्याने १०४ धावांची खेळी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे कूकने आपल्या कारकिर्दीतला अखेरचा सामनाही भारताविरुद्धच खेळला होता. ओव्हलच्या मैदानावर कूकने १४७ धावांची खेळी केली होती. हनुमा विहारीने त्याला बाद केलं होतं.
कारकिर्दीची सुरुवात व शेवट शतकाने करणारे फलंदाज
Web Title: 3 batsman who scored century in their debut and farewell test psd