• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 4 indian cricketers who won man of the series award in their debut series psd

कसोटी पदार्पणात मालिकावीराचा किताब पटकावणारे भारतीय खेळाडू

Updated: September 10, 2021 14:28 IST
Follow Us
  • कसोटी सामने हा क्रिकेटचा पारंपरिक प्रकार मानला जातो.
    1/9

    कसोटी सामने हा क्रिकेटचा पारंपरिक प्रकार मानला जातो.

  • 2/9

    ५ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये गोलंदाजांसह फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचाही खऱ्या अर्थाने कस लागतो. प्रत्येक दिवसाला खेळपट्टीप्रमाणे स्वतःला सावरुन खेळ करणं हे प्रत्येकासाठी आव्हानात्मक असतं.

  • 3/9

    याच कारणासाठी क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची एकदातरी कसोटी सामना खेळायला मिळायला हवा अशी इच्छा असते.

  • 4/9

    वृद्धीमान साहा

  • 5/9

    आज आपण कसोटी पदार्पणातच मालिकावीराचा किताब पटकावणाऱ्या ४ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 6/9

    १) सौरव गांगुली – १९९६ साली इंग्लंडविरुद्ध मालिकेत सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भारत मालिकेत ०-१ असा पिछाडीवर होता. सचिन आणि अझर हे दोन बिनीचे शिलेदार १०० धावांच्या आतच माघारी परतले. यानंतर गांगुलीने संघाचा डाव सावरत शतक झळकावलं. राहुल द्रविडसोबत सौरवने यादरम्यान महत्वाची भागीदारीही रचली. हा सामना अनिर्णित राखण्यात भारताने यश मिळवलं. यानंतरच्या कसोटी सामन्यात सौरवने पुन्हा एकदा शतक झळकावत ३ बळी घेतले, ज्यासाठी त्याला मालिकावीर घोषित करण्यात आलं.

  • 7/9

    २) रविचंद्रन आश्विन – २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत रविचंद्रन आश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २२ बळी आणि शतकी खेळी या जोरावर आश्विनने भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यात मदत केली. २-० च्या फरकाने भारत या मालिकेत जिंकला. पहिल्याच मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या आश्विनला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

  • 8/9

    ३) रोहित शर्मा – रोहित शर्माचं कसोटी क्रिकेटमधलं पदार्पण हे स्वप्नवत आहे. २०१३ साली कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सचिन तेंडुलकरने रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाची कॅप दिली. या मालिकेनंतर सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. पहिल्याच सामन्यात विंडीजविरुद्ध भारतीय संघाची अवस्था बिकट असताना रोहितने धडाकेबाज खेळी करत २८० धावांची भागीदारी केली. यानंतर मुंबई येथील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यातही रोहितने शतक झळकावलं, ज्यासाठी त्याला मालिकावीर घोषित करण्यात आलं.

  • 9/9

    ४) पृथ्वी शॉ – २०१८ साली मुंबईकर पृथ्वीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात पृथ्वीने शतक झळकावत आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही पृथ्वीने ७० धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. ज्यासाठी त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

Web Title: 4 indian cricketers who won man of the series award in their debut series psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.